शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
‘सैयारा’- एक अख्खी पिढी इतकी पागल का झाली आहे?
14
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
15
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
16
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
17
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
19
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
20
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  

आरक्षणाशिवाय नोकरभरतीस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 01:13 IST

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंतिरिम स्थगितीच्या निर्णयामुळे नाशिक येथे आयोजित बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाशिवाय शासकीय नोकरभरतीस विरोधही यावेळी करण्यात आला. सरकारने पुन्हा मोर्चे काढण्याची वाट बघू नये अन्यथा शांत मोर्चे आक्रमक झाल्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देमराठा समाजाची नाशिकमध्ये बैठक केंद्र शासनाचाही निषेध, आंदोलनाचा इशारा

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंतिरिम स्थगितीच्या निर्णयामुळे नाशिक येथे आयोजित बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाशिवाय शासकीय नोकरभरतीस विरोधही यावेळी करण्यात आला. सरकारने पुन्हा मोर्चे काढण्याची वाट बघू नये अन्यथा शांत मोर्चे आक्रमक झाल्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.९ सप्टेंबर रोजी आरक्षणाबाबत देण्यात आलेल्या अंतिरिम स्थगितीच्या अनुषंगाने रविवारी (दि.१३) औरंगाबाद रोडवरील वरदलक्ष्मी लॉन्स येथे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. यावेळी आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार नितीन भोसले, अव्दय हिरे, गणेश कदम, भाजपचे नेते सुुनील बागुल, तसेच समाजाचे समन्वयक करण गायकर, तुषार जगताप यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला तर केंद्र आणि राज्य सरकारातील मंत्री बाहेर पडू शकणार नाही असा इशारा गायकर यांनी दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि समन्वयकांची बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती मोर्चाचे राज्य समन्वयक तुषार जगताप देताना शैक्षणिक वर्षात मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये तसेच मराठा आरक्षणाशिवाय नोकरभरती करू नये यासंदर्भात राज्य शासनाची जबाबदारी राहील असे स्पष्ट केले. गणेश कदम यांनी समाज आक्रमक झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहतील, असे सांगितले. यावेळी फरांदे, सुनील बागुल, अव्दय हिरे, नितीन भोसले, शरद तुंगार, माधवी पाटील, मयुरी पिंगळे, संदीप शितोळे, नीलेश मोरे, राजू देसले बंदी भागवत, चेतन शेलार, संजय सामोसे यांनी मनोगत व्यक्त केले.मराठा समाजाच्या समस्यांबाबत उपसमितीच्या बैठकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयदेखील करण्यात आला.या बैठकीस आशिष हिरे, संतोष मालोडे, ज्ञानेश्वर थोरात, शरद तुंगार, संदीप शितोळे, किरण पणकार, नीलेश शेलार, चेतन शेलार, सचिन पवार, प्रशांत औटे, आकाश जगताप, राजेश मोरे, सचिन शिंदे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, मयुरी पिंगळे, तुषार भोसले, हेमंत मोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.फरांदे यांच्या विधानाला आक्षेपया बैठकीत आमदार देवयानी फरांदे यांनी आपल्या पक्षाच्या सरकारच्या काळात समाजासाठीच्या आरक्षणास काही उपस्थित युवकांनी आक्षेप घेतल्याने काहीसा गोंधळ उडाला. यावेळी करण गायकर व जगताप यांनी युवकांना शांत केले. तसेच फरांदे यांनी भाषण थांबविले. कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा फरांदे यांनी भाषण करताना समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला.आजपासून आमदार, खासदारांना निवेदने देणारमराठा समाजाच्या मागण्यांसाठी सोमवारपासून (दि.१४) नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांना या मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर या आमदार-खासदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच उपसमितीच्या अध्यक्षांना आणि आपापल्या पक्षाच्या अध्यक्षांना पत्र लिहावे. जे अशाप्रकारे पत्र लिहिणार नाहीत त्यांच्याविरोधात आंदोलन करून मतदारसंघात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.आरोग्य नियमांचे पालननाशिकमध्ये झालेल्या या बैठकीत फिजिकल डिस्टन्सिंंगसह आरोग्य नियमांचेकाटेकोर पालन करण्यात आले होते तसेच भविष्यात आॅनलाइन मिटिंगद्वारे समाजबांधवांशी चर्चा करून जागृती करण्याचे ठरविण्यात आले. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाच्या आदेशानंतर काही ओबीसी नेत्यांनी पेढे वाटल्याची केवळ अफवा होती. ओबींसींचे नेते छगन भुजबळ यांनीदेखील तशी माहिती दिली असल्याने त्यांच्यासंदर्भातील राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण