नव्याने होऊ घातलेला लोहमार्गाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 17:22 IST2020-08-05T17:20:23+5:302020-08-05T17:22:28+5:30
वाडीवºहे : इगतपुरी ते मनमाड या रेल्वेलाईनच्या रु ंदीकरण आणि तिसऱ्या व चौथ्या ब्रॉडगेज लाईनचे काम तसेच विद्युतीकरणाच्या रेल्वे प्रशासनाच्या प्रकल्पास हरकत घेण्यासाठी भूसंपादन विभागाकडे जाण्याआधी इगतपुरी तालुक्यातील मुकणे, पाडळी देशमुख, कुर्हेगाव येथील संभाव्य बाधित शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेत कैफियत मांडीत सदर लोहमार्गाला एकमुखी विरोध केला. हा लोहमार्गच रद्द करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी केली.

प्रस्तावित रेल्वे मार्गाला शेतकाºयांनी विरोध दर्शवित यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन देताना मुकणे, कुºहेगाव, पाडळी दे ग्रामस्थ .
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडीवºहे : इगतपुरी ते मनमाड या रेल्वेलाईनच्या रु ंदीकरण आणि तिसऱ्या व चौथ्या ब्रॉडगेज लाईनचे काम तसेच विद्युतीकरणाच्या रेल्वे प्रशासनाच्या प्रकल्पास हरकत घेण्यासाठी भूसंपादन विभागाकडे जाण्याआधी इगतपुरी तालुक्यातील मुकणे, पाडळी देशमुख, कुर्हेगाव येथील संभाव्य बाधित शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेत कैफियत मांडीत सदर लोहमार्गाला एकमुखी विरोध केला. हा लोहमार्गच रद्द करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी केली.
यावेळी संबंधीत रेल्वेच्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चरचे सहाय्यक महाव्यवस्थापक सचिन कुलकर्णी यांना प्रस्तावित रेल्वे लाईनसाठी जमिनी संपादित झाल्यास शेतकरी भूमिहीन होणार असुन या लोहमार्गाबाबत फेरविचार करावा अशी सुचना खासदार गोडसे यांनी केली. तर मुकणे, पाडळी देशमुख, कुºहेगाव येथील शेतकºयांनी खासदारांना लेखी निवेदन दिले. सदर लोहमार्गासाठी जुन्या लोहमार्गशेजारून जागा उपलब्ध असल्याने नवीन लाईनही त्याशेजारूनच टाकण्याचीही मागणी यावेळी शेतकºयांनी केली.
यावेळी पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, घोटी बाजार समितीचे संचालक विष्णु राव, आदिवासी संघटनेचे नेते तुकाराम वारघडे, मुकणे सहकारी संस्थेचे संचालक गणेश राव, ज्ञानेश्वर राव, गजिराम राव, भास्कर आवारी, अंबादास धोंगडे, जगन धोंगडे, हरिभाऊ गुळवे, गणेश धोंगडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.