शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठा क्रांती मोर्चा’ नावाने पक्ष स्थापनेला नाशिकमधून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:01 IST

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पक्ष स्थापन्याची घोषणा करणारे सुरेश पाटील हे स्वयंघोषित आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष असल्याचा आरोप करीत त्यांनी घोषित केलेल्या पक्ष स्थापनेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध असल्याची भूमिका नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर व तुषार जगताप यांनी सोमवारी (दि.२९) शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली.

नाशिक : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पक्ष स्थापन्याची घोषणा करणारे सुरेश पाटील हे स्वयंघोषित आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष असल्याचा आरोप करीत त्यांनी घोषित केलेल्या पक्ष स्थापनेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध असल्याची भूमिका नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर व तुषार जगताप यांनी सोमवारी (दि.२९) शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली.  मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट आरक्षण प्राप्त करणे आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मराठा संघटनांच्या पक्ष स्थापनेशी संबंध नाही. नाशिकसोबतच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव येथील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचाही पक्ष स्थापनेला विरोध असल्याचे सांगतानाच मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने पक्षाची निर्मिती करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचेही समन्वयकांनी सांगितले.  गेल्या आठवड्यात नवीन मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा नावाने पक्ष अथवा संघटनांची स्थापना करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून, अशा प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी त्यांना कडाडून विरोध करण्याची भूमिका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाची हीच भूमिका असून, नशिकमधूनही पक्ष स्थापनेला विरोध असल्याचे नाशिकच्या समन्वयकांनी सांगितले. यावेळी पुंडलिक बोडके, सचिन पवार, अमित नडगे, विशाल कदम आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कोणीही नेता नाहीमराठा क्रांती मोर्चात कोणीही नेता, मार्गदर्शक, पाठीराखा अथवा रसद पुरविणारा व्यक्ती नाही, हे मोर्चाचे ठळक वैशिष्ट्य आहे.‘ एक मराठा, लाख मराठा’ हे घोषवाक्य घेऊन मराठा समाज आपसातील मतभेद, पक्ष, संघटना विसरून एकवटला होता. ही एकजूट अशीच पुढेही कायम राहावी यासाठी मराठा समाजाचा कोणताही विशिष्ट पक्ष, संघटना अथवा नेता असणार नसल्याचेही नाशिकच्या समन्वयकांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाNashikनाशिक