शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कृषी विधेयकाबाबत विरोधकांकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:22 IST

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. हे विधेयक शेतकरी हिताचेच असून, विधेयकाबाबत काँग्रेससह विरोधी पक्षांकडून शेतकºयांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केला आहे.

ठळक मुद्देकेदा आहेर : भाजपाकडून शेतकऱ्यांची जनजागृती

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. हे विधेयक शेतकरी हिताचेच असून, विधेयकाबाबत काँग्रेससह विरोधी पक्षांकडून शेतकºयांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केला आहे.केंद्राने मंजूर केलेल्या कृषी विधेयकावर राज्यभरात भाजपाच्या वतीने शेतकरी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे, त्याचाच भाग म्हणून भाजपने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्यास सुरु केली. त्यावेळी आहेर बोलत होते.झाल्या. ते म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच ३ विधेयके तयार केली आहेत. सरकारकडून किमान आधारभूत किमतीला केली जाणारी शेतमाल खरेदी यापुढेही चालूच राहणार असून काँग्रेससारख्या पक्षांनी या विधेयकांविरोधात सुरु केलेला प्रचार मतलबी आहे , शेतकºयांनी या अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या ६ वर्षांत अनेक निर्णय घेतले आहेत. पीक विमा योजनेत बदल केल्यामुळे गेल्या ४ वर्षांत शेतकºयांना पीक विम्यापोटी ७७ हजार कोटींची भरपाई मिळाली आहे. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकºयांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. युपीए सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्याची इच्छाशक्ती कधीच दाखविली नाही. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे. या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने या ३ विधेयकाच्या रूपाने निर्णायक पाऊल टाकण्यात आलेले आहे. शेतकºयांना आता आपला शेतीमाल कोठेही विकता येणार आहे. यापुढील काळात शेतमाल साठवणुकीची व्यवस्था गावपातळीवर करण्यात येणार असल्याने शेतकºयांना आपला माल बाजारातील परिस्थिती पाहून विक्रिसाठी आणता येणार आहे. कंत्राटी शेती ऐच्छिक स्वरूपाची असून याबाबतचे वाद सोडविताना शेतकºयांचे हित जपले जाईल याला विधेयकात प्राधान्य देण्यात आले आहे. काँग्रेसची हरियाणात सत्ता असताना २००७ मध्ये कंत्राटी शेतीला सुरुवात झाली. काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात शेतमाल विक्रीवरील बंधने हटविण्याचे आश्वासन दिले होते. हाच काँग्रेस पक्ष केवळ राजकीय विरोधासाठी या विधेयकांना विरोध करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जिल्'ातील कोरोना काळातील सेवकार्याची पुस्तिका या वेळी प्रकाशित करण्यात आली. यावेळी भाजप शहराध्यक्ष गिरीष पलव, . सुनील बच्छाव, नंदकुमार खैरनार, भूषण कासलीवाल, प्रशांत जाधव , मीडिया सयोंजक प्रवीण अलाई, अमोल पवार ,प्रशांत गामणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन सुनील बच्छाव यांनी केले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपा