शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ क्रूर अमानवी अत्याचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 17:12 IST

बैठकीनंतर सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हा रूग्णालयात जाऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांची भेट घेतली. बाहेरील कोणत्याही व्यक्तींना पिडितांना भेटू देऊ नये, तरूणांना स्पेशल रूम उपलब्ध करून देत पोलिस संरक्षणाची मागणीचे पत्र संबंधित पोलीस ठाण्याला द्यावे, अशा मागण्या यावेळी केल्या.

ठळक मुद्देसर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले. अनैसर्गिक अत्याचारदेखील केल्याचे पिडितांनी सांगितलेशहरात संताप व्यक्त होत आहे

नाशिक : दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाऊसमध्ये गुरूवारी (दि.९) गुंडांच्या टोळीने मद्यधुंद अवस्थेत चक्क हवेत गोळीबार करत वाढदिवसाच्या नावाखाली ओली पार्टी करत धिंगाणा घातला होता. यावेळी डीजे आॅपरेटर असलेल्या दोघा तरूणांना विवस्त्र करून अमानुषपणे या टोळक्याने मारहाण करत त्यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचारदेखील केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे. या अमानवी अशा घृणास्पद राक्षसी कृत्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले. शनिवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.पंचवटीमधील सराईत गुन्हेगार संदेश काजळे व त्याच्या गुंड साथीदारांनी फार्महाऊसमध्ये पहाटेपर्यंत हैदोस घातला. दोघा युवकांसोबत कुरापत काढून पिस्तुलमधून हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करून विवस्त्र होण्यास भाग पाडले. उघड्या शरिरावर गुंडांनी कमरेच्या पट्टयासह मिळेल त्या वस्तूने अमानूषपणे बेदम मारहाण केली. अनैसर्गिक अत्याचारदेखील केल्याचे पिडितांनी सांगितलेल्या आपबितीमधून समोर आले आहे. पिडीत तरूणांना न्याय मिळावा आणि राजकिय वरदहस्त प्राप्त करून देत गुंडांना पाठीशी घालणाऱ्या आमदार देवयानी फरांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीसाठी येत्या शनिवारी मोर्चा काढण्याचा निर्णय शासकिय विश्रामगृहावर सोमवारी (दि.१३) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला व्यासपिठावर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संजय अपरांती, शरद आहेर, हेमलता पाटील, कविता कर्डक, राजेंद्र बागुल, किरण मोहिते, दिपक डोके, सुरेश दलोड, संतोष सोनपसारे, तानाजी जायभावे यांच्यासह पिडित युवकांचे कुटुंबियदेखील उपस्थित होते. मंगळवारी (दि.१४) सकाळी पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांना शिष्टमंडळ भेटणार आहे. यावेळी संशयित आरोपींना पाठीशी घालत राजकिय वरदहस्त देणाऱ्या आमदार देवयानी फरांदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून संशयित सहआरोपी म्हणून अटक करावी, अशी मागणी करण्यात येईल असे स्पष्ट केले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीMorchaमोर्चा