पदाधिकाऱ्यांच्या मुदतवाढीला युतीच्या गटनेत्यांचा विरोध

By Admin | Updated: August 2, 2014 01:22 IST2014-08-01T23:00:27+5:302014-08-02T01:22:12+5:30

न्यायालयाचा अवमान नको;केंद्राकडे करणार मागणी

Opposition to the leader of alliance leaders at the deadline for office bearers | पदाधिकाऱ्यांच्या मुदतवाढीला युतीच्या गटनेत्यांचा विरोध

पदाधिकाऱ्यांच्या मुदतवाढीला युतीच्या गटनेत्यांचा विरोध

नाशिक : येत्या २१ सप्टेंबर रोजी मुदत संपत असलेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच जिल्हा परिषदेतील भाजपा-शिवसेनेच्या गटनेत्यांनी त्यास विरोध केला असून, न्यायालयाने आचारसंहिता काळात या निवडणुका घेण्याबाबत काही अडचण नसल्याचे स्पष्ट केल्याने या निवडणुका वेळेतच व्हाव्यात, अशी मागणी गटनेते केदा अहेर व प्रवीण जाधव यांनी केली आहे.
रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कॉँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र मेळाव्यासाठी नाशिकला येत असून, या त्यांच्या नाशिक भेटीत जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी त्यांना भेटून जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकांना तीन महिने मुदतवाढ देण्याबाबत विनंती करणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. २१ सप्टेंबरला विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपत असून, त्यांना सहा महिने मुदतवाढ मिळणार असल्याची सुरुवातीला चर्चा होती; मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांना मुदतवाढ दिल्यानंतर शासनाला न्यायालयाने फटकारल्याने ही मुदतवाढ मागे घेऊन नियोजित वेळेतच नगराध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळाची मुदत संपत असून, त्यांच्या निवडणुका २१ सप्टेंबरला होणे अपेक्षित आहे. मात्र या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी आता आघाडीचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच शिवसेना-भाजपा युतीच्या गटनेत्यांनी त्यास कडाडून विरोध केला आहे. पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊ नये, यासाठी केंद्रीय पातळीवर ग्रामविकास मंत्रालयाकडे यासंदर्भात मागणी करणार असल्याचे केदा अहेर व प्रवीण जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हरिनाम सप्ताहाची सांगता
संगमेश्वर : येथील सावता महाराज मंदिराच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला. सोहळ्यात रोज काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, श्री नवनाथ कथा कथन बबन महाराज (धरणगाव) यांनी केले.

Web Title: Opposition to the leader of alliance leaders at the deadline for office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.