शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप करण्यास विरोध

By Admin | Updated: September 5, 2015 21:51 IST2015-09-05T21:51:10+5:302015-09-05T21:51:36+5:30

शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप करण्यास विरोध

Opposition to interference in the field of education | शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप करण्यास विरोध

शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप करण्यास विरोध

येवला : संस्थाचालक-शिक्षकांकडून निषेध,गटशिक्षणाधिकारी यांना निवेदनयेवला : खासगीकरणाच्या रेट्याखाली केंद्र व राज्यशासन त्यापुढे झुकत असून शिक्षण क्षेत्रात मनमानी हस्तक्षेप करीत आहे. याचे घातक परिणाम शिक्षणावर होत आहे. याचा तीव्र शब्दात निषेध येवला तालुक्यातील संस्थाचालक व शिक्षकांनी केला.
येवला तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत व सहायक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे व गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांना निवेदन दिले. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता तालुक्यातील शिक्षण संस्थाचालक, शिक्षण प्रेमी नागरिक व शिक्षक पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर जमले. शासनाच्या शिक्षणविषयक बाजारीकरण करणाऱ्या धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, जे.पी नाईक यांनी पुरोगामी विचार रु जवलेल्या महाराष्ट्रात शिक्षणाचे भवितव्य चिंताजनक बनत चालले आहे. यावर संघटित लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पंकज पारख यांनी केले. यावेळी समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी शासनाच्या शिक्षणविषयक धोरणावार टीका केली. निवेदनाचे वाचन माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तकुमार उटावळे यांनी केले. शिक्षक फेडरेशनचे सदस्य दत्ता महाले यांनी शासन दररोज काढीत असलेली परिपत्रके व त्याचा शिक्षणाचे धोरणावर होत असलेल्या दूरगामी परिणामाबाबत चिंता व्यक्त केली. अनेक अडचणींचा विचार शिक्षणविषयक धोरण ठरवताना शासन विचार करणार आहे की नाही अथवा शिक्षणविषयक सुधारणा केवळ घोषणाबाजीचा फार्स तर नाही? असा सवाल किरण परदेशी यांनी उपस्थित केला.
निवेदनात शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या सात टक्के खर्च केला पाहिजे, शाळांना बारा टक्के
वेतनेतर अनुदान द्यावे, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये, शिक्षक शिक्षकेतर भरती शिक्षणसंस्थेकडेच ठेवावी आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. या निषेध आंदोलनात रामदास कहार, गणपत गायकवाड, किशोर जगताप, पुष्पा गुप्ता, चंपा रणदिवे, लता लिमजे, बाळासाहेब सोमासे, भाऊसाहेब मगर, राजेंद्र पाखले, दिलीप पाखले, कानिफ मढवई, पुंडलिक सोनवणे, शिवाजी शिंदे यांचेसह संस्थाचालक, शिक्षक सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Opposition to interference in the field of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.