दारणाच्या विसर्गाला विरोध

By Admin | Updated: January 18, 2016 22:31 IST2016-01-18T22:28:25+5:302016-01-18T22:31:10+5:30

शेतकरी संतप्त : सोडलेले पाणी तत्काळ बंद करण्याची मागणी

Opposition to Dana Disharga | दारणाच्या विसर्गाला विरोध

दारणाच्या विसर्गाला विरोध

घोटी : इगतपुरी तालुक्यात
यावर्षी सरसरीच्या तुलनेत अल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची भिस्त असलेल्या दारणा धरण समूहातील दारणा, मुकणे व भावली या धरणांचा साठाही असमाधानकारक झाला. असे असताना या धरण समूहातून पिण्याच्या आणि सिंचनाच्या नावाखाली गेल्या दोन महिन्यांपासून बेसुमार विसर्ग सुरू असून, यामुळे या धरणांनी तळ गाठण्यास सुरु वात केली आहे.
यामुळे तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाईची भीती व्यक्त
करण्यात येत असून, धरणालगतची शेतीही धोक्यात आली आहे. शासनाने पाण्याचा विसर्ग तातडीने बंद करावा अन्यथा यासाठी तालुक्यातील शेतकरी सामूहिक
लढा देतील, असा एकमुखी निर्णय घोटी येथे सोमवारी (दि. १८) झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला.
घोटी येथे दारणा धरणालगतच्या शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शेतकरी नेते
पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी होते.
दरम्यान, शासनाने पाण्याचा विसर्ग त्वरित थांबवावा अन्यथा जनआंदोलन करून हे पाणी बंद करण्यात येईल, असा सर्वमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात
आला.
या बैठकीस संपत काळे, रमेश जाधव, उदय जाधव, नामदेव
भोसले, बाळासाहेब वालझाडे,
रमेश शिंदे, ज्ञानेश्वर कडू,
विलास मालुंजकर, नारायण
पढेर, त्र्यंबक गोलवड, सुरेश भोर,
केरू देवकर, समाधान गुंजाळ,
दशरथ पागेरे, किसन पदमिरे,
वामन लंगडे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Opposition to Dana Disharga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.