अंगणवाड्या बंद करण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:12 AM2018-06-20T01:12:12+5:302018-06-20T01:12:12+5:30

नाशिक : पटसंख्येत घट झालेल्या १४३ अंगणवाड्या बंद करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी भारतीय हितरक्षक सभेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांनी महापालिका मुख्यालयासमोर मंगळवारी (दि.१९) धरणे करीत निदर्शने केली.

Opposite to stop the anganwadi | अंगणवाड्या बंद करण्यास विरोध

अंगणवाड्या बंद करण्यास विरोध

Next
ठळक मुद्देसेविकांचे धरणे मुख्यालयासमोरच केली निदर्शने

नाशिक : पटसंख्येत घट झालेल्या १४३ अंगणवाड्या बंद करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी भारतीय हितरक्षक सभेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांनी महापालिका मुख्यालयासमोर मंगळवारी (दि.१९) धरणे करीत निदर्शने केली.
नाशिक महापालिकेच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या अंगणवाड्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. यात वीस ते चोवीस पटसंख्या असलेल्या अंगणवाड्या बंद करण्याचा प्रस्ताव असून, त्यास विरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संघटनेचे सभानायक किरण मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे तसेच समाजकल्याण उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांना निवेदन देण्यात आले. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची पटसंख्या किमान पंधरा आणि कमाल वीस इतकी करण्यात यावी. लोकसंख्येच्या तुलनेत दर चार हजारांसाठी एक याप्रमाणे अंगणवाड्यांची पुनर्रचना करावी, अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्य खेळणी, तक्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, आदी मूलभूत सुविधा द्याव्यात. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पुढील जीवन जगण्यासाठी एखाद्या योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य द्यावे. मनपाच्या अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रशिक्षण द्यावे महापालिका प्रशासन अंगणवाडीच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करीत नाही तोपर्यंत अंगणवाड्या बंद करू नये, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या आंदोलनात कृष्णा शिंदे, भागवत गांगुर्डे, विकास रोकडे, संदीप कोळे आदींसह अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Opposite to stop the anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.