शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसी,'सीएए'सह विरोधात 22 अल्पसंख्याक भाजप पदाधिकाऱ्यांचा घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 19:31 IST

सामूहिक राजीनामे अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्षांसह भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत, असे प्रदेश सचिव इमरान चौधरी सांगितले.

ठळक मुद्देनोकरी, महागाई, मंदी, शिक्षणासह आरोग्य याकडे दुर्लक्ष जातीचे राजकारणावरच भर 'सीएए', 'एनआरसी'असे निर्णय हे एका विशिष्ट समाजाच्या विरोधात

नाशिक : एनआरसी, 'सीएए'सह अल्पसंख्याक समाजाच्या विरोधातील विविध निर्णयामुळे भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या २२ पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रदेश सचिव इमरान चौधरी यांनी शनिवारी(दि.१८) दिली.भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिव इमरान चौधरी यांच्यासह भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या माजी शहराध्यक्ष अहेमद काझी, शहर उपाध्यक्ष वसीउल्लाह चौधरी, शहर सचिव दानिश वार्सी, अब्दुल खान, राजेश सोनार, नंदुर इंगळे, प्रचिन भिन्ने, नसिम चौधरी, तौफिक सय्यद, अक्बर खान, रफिक अंसारी,मुबारक खान, जावेद खान, महेराज शेख, बादशाह खान, इस्माईल चौधरी, समीर सिद्दीकी, रियाज चौधरी, हसन जहीर व सलीम खान यांनी यावेळी आपल्या पदाचे राजीनामे देत भाजपचा जाहीर निषेध केला.चौधरी यांनी सांगितले की, 'सीएए'कायदा लागू झाला, त्यानंतर 'सीएए' आणि 'एनआरसी'बाबत जनसामान्यात असलेल्या रोषाची माहिती पक्ष श्रेष्ठीसह प्रदेशाध्यांना दिली होती. गेल्या काही महिन्यात भाजप सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. ट्रिपल तलाक, कलम ३७०, मुस्लिम आरक्षण न देणे, 'सीएए'आणि 'एनआरसी'असे निर्णय हे एका विशिष्ट समाजाच्या विरोधात आहे. यामुळे पूर्वी जो समाज या पक्षाच्या जवळ आणण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. ते प्रयत्न अयशस्वी होत आहे. सीएए आणि एनआरसी हे कायदे भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे सामूहिक राजीनामे अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्षांसह भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी