शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांनाही संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 1:22 AM

बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विविध विद्याशाखांना प्रवेशाची संधी अजूनही उपलब्ध असून, या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळले आहे.

नाशिक : बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विविध विद्याशाखांना प्रवेशाची संधी अजूनही उपलब्ध असून, या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळले आहे. विशेष म्हणजे विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियाही अजून सुरू असल्याने पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार उपलब्ध जागेवर प्रवेश मिळविणे शक्य होणार आहे.महाराष्ट्र सरकारच्या सततच्या शैक्षणिक धोरणामुळे यावर्षी प्रवेशप्रक्रियेला दिरंगाई झाली असून, ही दिरंगाई पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडणार आहे. प्रवेशप्रक्रियेच्या प्रारंभीच्याच काळात आॅनलाइन प्रवेश प्रणालीत तांत्रिक अडचणी उद्भवल्याने पारंपरिक विद्याशाखांसह व्यावसायिक शाखांतील पदवी व पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरू असून, या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे.यंदा सर्वच व्यावसायिक शाखांच्या प्रवेशप्रक्रियेला विलंब झाला आहे. राज्यातील पूरस्थितीचा फटकाही प्रवेशप्रक्रियेला बसला असून, अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुक्त विद्यापीठासह विविध स्वायत्त महाविद्यालयांमधील शिक्षणक्रमांनाही प्रवेश घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळले आहे.शिक्षण मंडळाने नाशिकसह राज्यभरातील नऊ विभागीय मंडळामार्फ त जुलै व आॅगस्ट २०१९ महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नाशिक विभागाचा सुमारे ३ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना लांबलेल्या प्रवेशप्रक्रियेचा फायदा होणार असून, विविध अभ्यासक्रमाच्या उर्वरित टप्प्यांमध्ये या विद्यार्थांना सहभागी होता येणार आहे.दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची फेब्रुवारी व मार्च २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. यातील बारावीचा निकाल जाहीर झाला असून, दहावीच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, मुख्य परीक्षेत यंदा निकालाची टक्केवारी घसरल्याने अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे आॅक्टोबरऐवजी १७ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत पुरवणी परीक्षा घेतली होती. यातून उत्तीर्ण झालेल्या ३ हजार ८९८ विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने पुढील पाऊल टाकता येणार आहे. बारावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी पदविका, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या (डिप्लोमा) प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने येथेही विद्यार्थ्यांना संधी असेल.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी