मतदार नोंदणीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:06 PM2019-03-02T22:06:54+5:302019-03-02T22:07:53+5:30

नाशिक : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नोंदणीपासून वंचित राहिलेल्या अर्हता प्राप्त नागरिकांनी या विशेष संधीचा लाभ घेऊन मतदानप्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

Opportunity registration opportunity | मतदार नोंदणीची संधी

मतदार नोंदणीची संधी

Next
ठळक मुद्देविशेष मोहीम : निरक्षरांसाठी होणार चावडी वाचन

नाशिक : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नोंदणीपासून वंचित राहिलेल्या अर्हता प्राप्त नागरिकांनी या विशेष संधीचा लाभ घेऊन मतदानप्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार नोंदणीसाठी दि. २३ व २४ फेब्रुवारी रोजीदेखील विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यादिवशी नोंदणी करू न शकलेल्या मतदारांसाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्र. ६, ७, ८ व ८ अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरिकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.
सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असून, गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक कल्याण संघटना आणि सर्व ग्रामसभांनीदेखील या मोहिमेची माहिती नागरिकांना द्यावी.
मतदार ओळखपत्र हे मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असून, मतदाराचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येणार आहे. मतदार ओळखपत्र असले तरी नागरिकांनी मतदार यादीत आपल्या नावाची खातरजमा करून घ्यावी. विशेषत: १८ वर्ष पूर्ण केलेल्या युवकांनी, पात्र दिव्यांग नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. आॅनलाइन नाव नोंदणीची सुविधा मतदारांच्या सोयीसाठी संकेतस्थळावर आॅनलाइन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहितीही देण्यात आली. नोंदणी करू न शकलेल्या मतदारांसाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

Web Title: Opportunity registration opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.