शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

प्रस्थापितांचे घोंगडे झटकून नवोदितांना संधी

By किरण अग्रवाल | Published: October 27, 2019 1:25 AM

छगन भुजबळ, दादा भुसे, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर व नरहरी झिरवाळ या विद्यमानांचे निकाल दृष्टिपथात होतेच; पण याखेरीजच्या अन्य मातब्बरांना धक्के देत मतदारांनी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना चपराक लगावली आहे. दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे व मौलाना मुफ्ती यांना ‘कम बॅक’ करण्याची संधी त्यातूनच लाभून गेली.

ठळक मुद्दे उमेदवार किंवा त्यांच्या पक्षांचाच नव्हे, तर हा मतदारांचाही विजयगृहीत धरणाऱ्यांना  आणले जमिनीवरकोणी कितीही म्हटले तरी यंदाची निवडणूक एकतर्फी नाही

सारांशपक्षांतरे असोत, की उमेदवारी; मतदारांना गृहीत धरून राजकीय पक्षांकडून घेतले जाणारे निर्णय प्रसंगी कसे ठोकरून लावले जाऊ शकतात याचा पुन:प्रत्यय याही निवडणुकीत येऊन गेला आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत प्रस्थापित उमेदवारांना नाकारत नवोदितांना मुंबईत पाठविले गेल्याचे निकाल तेच सांगून जाणारे आहेत.कोणी कितीही म्हटले तरी यंदाची निवडणूक एकतर्फी नाही, हे याच स्तंभात वेळोवेळी निदर्शनास आणून दिले गेले होते. तरी काही उमेदवार आपल्याला स्पर्धाच नसल्याच्या आविर्भावात वावरत होते. सत्ताधारी भाजप-शिवसेना या पक्षांची तर आपण ठरवू ती पूर्व दिशा, अशीच वाटचाल होती. त्यातून भरघोस प्रमाणात पक्षांतरे तर घडून आलीच, शिवाय जनमानसाचा अंदाज न घेता; अगर त्यांना गृहीत धरून उमेदवाºया दिल्या गेल्या. त्याचा फटका संबंधिताना बसला. जिल्ह्यातील नऊ विद्यमान आमदारांना पराभवास सामोरे जाण्याची वेळ आल्याचे पाहता, वातावरण जर खरेच सत्ताधाºयांना अनुकूल राहिले असते तर असे घडले असते का, असा साधा प्रश्न यातून उपस्थित होऊ शकणारा आहे. कारण, यात विरोधी पक्षांच्या उमेदवारांखेरीज सत्ताधारी पक्षांचे अनिल कदम, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप व निर्मला गावित यांचाही समावेश आहे.महत्त्वाचे म्हणजे, कळवण-सुरगाण्यातील जे.पी. गावित, देवळालीतील घोलप व नांदगावमधील पंकज भुजबळ हे जिल्ह्यातील त्या त्या पक्षातील मातब्बर व प्रस्थापित उमेदवार होते. गावितांनी आजवर त्यांचा लालगड अभेद्य राखला होता, तर घोलपांनीही तब्बल तीन दशके एकहाती वर्चस्व राखलेले होते. पण मतदारांच्या मानसिकतेतील बदलाचा विचार करून स्वत:त बदल न केल्याने त्यांना जनतेनेच घडविलेल्या बदलाला सामोरे जावे लागले. नांदगावात पंकज भुजबळ व नाशिक पूर्वमध्ये बाळासाहेब सानप थांबू शकले नाहीत, त्यामुळे मतदारांनी त्यांना थांबवले. इगतपुरीमध्ये तर काँग्रेसच्याच तिकिटावर लढल्या असत्या तर निवडून येण्याची शक्यता अधिक राहिलेल्या निर्मला गावित यांनी शिवसेनेत जाऊन शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या या प्रयत्नावर मतदारांनी पाणी फिरवले. म्हणजे, वर्षानुवर्षांपासून काम करणाºयांना पक्षाकडून डावलले जाणे जसे मतदारांना रुचले नाही, तसे केवळ सत्तेच्या छावणीत जाऊ पाहण्याचे प्रयत्नही पटले नाही हेच निकालावरून लक्षात यावे.अर्थात, निफाडमध्ये अनिल कदम यांची विजयाची हॅट्ट्रिक हुकण्यामागे मतविभाजनाचे प्रमुख कारण दिसून येते, तर नांदगावमध्ये सुहास कांदे यांच्या विजयासाठीही हाच फॅक्टर कारणीभूत ठरला. सर्वाधिक उत्कंठेची लढत ठरलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे यांना मिळालेला विजयही मतविभाजनातूनच साकारल्याचे स्पष्ट आहे. येथे एकाच मतदारसंघात अनेकांनी बळ आजमावणी केली. त्यातून मतांचे विभाजन होऊन पक्षीय बांधिलकीतून लाभलेली मते व गत पाच वर्षातील काम आणि संपर्कामुळे सीमा हिरे यांचा विजय सुकर ठरून गेला. हे होत असताना ज्या जागेसाठी संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी राजीनामास्र उगारून प्रतिष्ठा पणास लावली तेथे मात्र सेना बंडखोराला मतदारांनी तब्बल पाचव्या क्रमांकावर ठेवल्याची बाब या पक्षासाठीच नाचक्कीदायी ठरली.एक बरे झाले, प्रस्थापिताना ठोकरताना मतदारांनी नवीन चेहºयांना संधी देत राजकीय प्रवाहावरील शेवाळ दूर करण्याचा प्रयत्न केलेलाही दिसून आला. देवळालीतील सरोज अहिरे या तर तब्बल ५८ टक्केपेक्षा अधिक मतांनी निवडून आल्या आहेत, तर ज्यांना कुणी जमेत धरले नव्हते त्या इगतपुरीतील कॉँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनीही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिकची मते मिळवून आपला विजय नोंदविला. बोलून दाखविल्या जाणाºया लाटेपेक्षा सुप्त लाट कशी उलथापालथ घडवते, ते या दोन्ही ठिकाणी पहावयास मिळाले. कळवणमध्ये धडपडी व पित्याचा सर्वसमावेशक राजकारणाचा वारसा चालवू पाहणाºया नितीन पवार या तरुणाला पसंती लाभली, तर नाशिक पूर्वमध्येही त्याच पद्धतीने म्हणजे पित्याच्या पावलावर पाऊल ठेवणाºया अ‍ॅड.राहुल ढिकले यांना पहिल्या प्रयत्नातच मतदारांनी समर्थन दिले. नांदगावमध्ये सुहास कांदे यांनी स्वप्नपूर्ती साधली. हे पाचही नवीन चेहरे यंदा जिल्ह्याला लाभले. शिवाय, बनकर, कोकाटे, बोरसे व मौलानांचे ‘कम बॅक’ झाल्याने सहाही विद्यमानांसह हे सारे नवे-जुने मिळून मतदारांची अपेक्षापूर्ती साधतील, अशी आशा करूया...

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019PoliticsराजकारणChagan Bhujbalछगन भुजबळManikrao Kokateमाणिकराव कोकाटेNarhari Jhariwalनरहरी झिरवाळ