शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

समाजाची परिवर्तनशीलता, धर्माची गतिमानता अवलोकनाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:42 IST

भगवी पताका खांद्यावर घेऊन वारकरी उन्हा-पावसाची तमा न बाळगता गेली शेकडो वर्षे वारीत चालत आहे. जणूकाही संपूर्ण महाराष्ट्रच पंढरीची वारी करत असतो. शेतकरी, कष्टकरी असलेला हा समाज एका श्रद्धेने पंढरीची वारी करत आहे. कपाळी उभा गंध, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात विठ्ठल नाम हेच वारकरी समाजाचे द्योतक आहे.

ठळक मुद्दे संतांची शिकवण हे महाराष्ट्राचे मूल्य आहे.

भगवी पताका खांद्यावर घेऊन वारकरी उन्हा-पावसाची तमा न बाळगता गेली शेकडो वर्षे वारीत चालत आहे. जणूकाही संपूर्ण महाराष्ट्रच पंढरीची वारी करत असतो. शेतकरी, कष्टकरी असलेला हा समाज एका श्रद्धेने पंढरीची वारी करत आहे. कपाळी उभा गंध, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात विठ्ठल नाम हेच वारकरी समाजाचे द्योतक आहे.संत तुकाराम महाराज यांची पालखी देहू, आळंदी येथून पंढरपूरकडे निघते आणि लाखो वारकरी या पालखीसोबत चालतात. संतांची शिकवण हे महाराष्ट्राचे मूल्य आहे. या मातीत जन्मलेले राजे छत्रपती शिवराय ते शाहू महाराज यांनी संतांच्या शिकवणीचे पालन केले आहे. संत वैष्णव धर्माची मांडणी करतात, जी समानतेवर आधारित आहे. संतांना भेद पसंत नाही. गरीब- श्रीमंत, स्त्री-पुरुष, जातीची उच्च-निचता हे संतांना मान्य नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ जग हे एक पावन शक्तीने भरलेले आहे. इथे भेदाभेद करणे अमंगळ आहे, हेच वारीचे सूत्र आहे. संत ज्ञानेश्वरांनीही पसायदानात भगवंताकडे खळांचे खळपण नष्ट व्हावे, अशी उदात्त मागणी केली आहे. पंढरपूरची वारी म्हणजे लोकांनी लोकांना लावलेली शिस्त आहे. संतांची शिकवण अंगी उतरावी म्हणून केलेली तपश्चर्या आहे.वारकरी संप्रदायाने दिंडी वारी, यात्रा अशा सामूहिक उपासनेवर प्रतिज्ञाबद्ध होऊन कटाक्षाने भर दिलेला आहे. त्यामागे व्यक्ती-समाज-धर्म यातील परस्पर संबंधाचा विपूल मानस शास्त्रीय आशय असल्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता दिसून येते. समाजाची परिवर्तनशीलता व धर्माची गतिमानता या विषयीचे साक्षेपी अवलोकन करण्याची दुर्मीळ संधी अशा सामूहिक दिंडी सोहळ्यातून व पंढरीच्या वारीतून मिळते. प्रपंचात व्यवस्था असते पण वारीमध्ये सुखानुभूतीची अवस्था प्राप्त होते म्हणून पंढरीची वारीची ओढ असते. वारीमध्ये प्रेम, त्याग, सेवा, विश्वबंधुत्व अशा थोर सद्गुणांची शिकवण व जोपासना घडविण्याचे सामर्थ्य पंढरीच्या वारीत आहे, यामुळे दिवसेंदिवस वारीची अभिवृद्धी होताना दिसते, कारण वारी नुसती प्रथा नाही तर ती संत परंपरा आहे. वारीमध्ये सद्गुणाचे शिक्षण, शिकवण व संस्कार आपोआप होतात. ही भक्तीप्रेमाची ऊर्जा पुढील वारीपर्यंत टिकते. नामस्मरणाची गोडी वारीतच वाढते. ज्ञान, प्रेम, भक्तीने माणसं वारीतच जोडायची असतात, याकरिता प्रत्येकाने एकदा तरी पंढरीची वारी करावी.वारीचे तीन आठवडे माणूस चालतो, असा रस्ता जो त्याला समानतेकडे, भक्तीकडे, संवेदनशीलतेकडे आणि निसर्गाकडे घेऊन जातो. वारीच्या रस्त्यावर भाविक हा रस्त्यावर झोपतो, तो उन्हात चालतो, तो झाडाखाली बसतो, तो पावसात भिजतो, तो निसर्गातील प्रत्येक कणाशी एकरूप होतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘अणुरेणूहुनी तोकडा, तुका आकाशा ऐवढा...’ हा अनुभव घेण्यासाठी संतांची ही वारी परंपरा इथल्या मातीला वारकऱ्यांना समृद्ध करते. काळ्या मातीची आणि अथांग आकाशाची साक्ष ठेवत पावसाच्या सरींनी भक्तिरसाने चिंब करणारी ही वारी अवर्णनीय आहे. महाराष्ट्राची माती ही पुरोगामी आहे. इथे भेदाभेद भ्रम मानला जातो, हे देशाला दिसले आहे. म्हणूनच राज्याने देशाला समता-बंधुता शिकविली आहे. जगाच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे अथवा माहिती तंत्रज्ञानाच्या युगामुळे जगात प्रचंड बदल झाले असले तरी वारीची ही परंपरा युगानुयुगे चालत राहणार आहे. कारण वारीचा पाया हा संतांच्या भक्कम साहित्यावर, त्यावरील मूल्यांवर आधारित आहे. भक्तिरसाने ओथंबलेल्या या वारीचा मोह अनेकांना सुटता सुटत नाही. शरीराने साथ दिली नाही तरी मन थांबत नाही. पृथ्वीच्या पाठीवर चालणारा हा सोहळा स्वर्गसुखाची अनुभूती देणारा आहे. या भक्तिसागरात न्हाऊन निघण्यासाठी वारी अनुभवलीच पाहिजे.याठिकाणी वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून देणे, रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे, डॉक्टर व औषधी तसेच अन्य साधनसामग्रीची व्यवस्था करण्यासाठी आम्ही ट्रस्टमार्फत प्रयत्न करतो या कार्यासाठी हजारो ‘दात्यांचे’ हात पुढे येतात; परंतु यासाठी महिनाभरापासून जुळवाजुळव करावी लागते. याठिकाणी काही वेळा कमतरता असते; परंतु वारकरी कशाचीही पर्वा न करता पायी चालत राहतात.(लेखक निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे माजी अध्यक्ष)