शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

मानोरी, कणकोरी ग्रामपंचायतीत नवोदितांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 9:20 PM

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी व कणकोरी येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची झाल्याने मतदारांनी नवोदितांच्या बाजूने कौल दिला. दोन्ही ठिकाणी तरुणांना संधी मिळाल्याने त्यांना गावगाडा हाकण्याची संधी मिळाली आहे.

ठळक मुद्देकणकोरीत परिवर्तन पॅनलने बहुमत प्राप्त

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी व कणकोरी येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची झाल्याने मतदारांनी नवोदितांच्या बाजूने कौल दिला. दोन्ही ठिकाणी तरुणांना संधी मिळाल्याने त्यांना गावगाडा हाकण्याची संधी मिळाली आहे. या निवडणुकीत काही वॉर्डांमध्ये मातब्बरांना धूळ चारत युवकांनी बाजी मारली. मानोरीत ग्रामविकास तर कणकोरीत परिवर्तन पॅनलने बहुमत प्राप्त केले.मानोरी ग्रामपंचायतीच्या चार वॉर्डात ११ सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत ६ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर पाच जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात होते. वॉर्ड क्रमांक दोन मध्ये एका जागेसाठी तिरंगी लढत होत युवा शक्ती पॅनलच्या सुवर्णा ज्ञानेश्वर सांगळे (१४४) यांनी विजय मिळवला. वॉर्ड क्र. तीन मध्ये तीन जागांसाठी समोरासमोर लढत होत ग्रामविकास पॅनलने बाजी मारली. योगेश रामनाथ सानप (४००), तुकाराम भोमाजी सांगळे (४५३), उषा नामदेव सांगळे (४९०) यांनी विजय मिळवला. वॉर्ड क्र. चार मध्ये एका जागेसाठी लढत होत सोमनाथ हरिभाऊ जाधव (३८३) यांनी विजय मिळवला.तर यापूर्वी वॉर्ड क्र. एकमधून मच्छिंद्र चांगदेव म्हस्के व पुष्पा योगेश कर्डेल, वॉर्ड क्र. दोनमधून भाऊसाहेब पंढरीनाथ नवले व श्रद्धा शांताराम कोरडे तर वॉर्ड क्र. चार मधून वंदना गणेश चकणे व मंगल सुरेश सांगळे यांची बिनविरोध निवड झाली होती.कणकोरी ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांना पायउतार करीत मतदारांनी कणकेश्वर परिवर्तन ग्रामविकास पॅनलला संधी दिली. ९ जागांपैकी १ जागा बिनविरोध झाल्याने आठ जागांसाठी परिवर्तन व ग्रामविकास पॅनलमध्ये समोरासमोर लढत झाली. वॉर्ड क्र. एक मध्ये तिन्ही जागा ग्रामविकास पॅनलने पटकाविल्या. वत्सला दादाहरी सांगळे (१६२), संतू मुरलीधर सानप (१३८), मनिषा सोमनाथ जगताप (१९३) हे विजयी झाले. वॉर्ड क्र. दोन मध्ये परिवर्तन पॅनलचे अण्णासाहेब कारभारी बुचकुल (२२७), योगिता रामनाथ सांगळे (२२८), ज्योती गणेश सांगळे (२१८) यांनी विजय मिळवला. तर वॉर्ड क्र. तीन मध्ये परिवर्तनचे सुरेश झुंबर थोरात (२४९) व शिवानी दिलीप माळवे (२४८) यांनी बाजी मारली. वसंत विधाते यांची बिनविरोध निवड झाली. निकालानंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक