शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्णांसाठी मंगळवारपासून प्रवेशाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 18:20 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे निकाल झाले असून, या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांवर प्रवेश मिळणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सूचना यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून, आता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेण्यासाठी मंगळवार (दि. ३) पासून प्रवेशफेरी राबविण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देपुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे निकाल झाले असून, या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांवर प्रवेश मिळणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सूचना यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून, आता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेण्यासाठी मंगळवार (दि. ३) पासून प्रवेशफेरी राबविण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिक शहरातही दोन वर्षांपासून आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असून, यावर्षी प्रवेशप्रक्रियेतील तीन नियमित आणि एक विशेष फेरी झाल्यानंतर ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ अशा एकूण पाच फेºयांमध्ये जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, दहावीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्यात आली असून, या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.३०) जाहीर झाला असून, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी संधी देण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षण विभागातर्फे  पुन्हा एकदा प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरी राबविली जाणार आहे. या फेरीचे वेळापत्रकही जाहीर झाले असून, दि. ३ ते ७ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका घेऊन प्रवेश अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतरच दि. ९ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.

सात हजार जागा उपलब्धशहरातील विविध महाविद्यालयांमध्ये अजूनही सहा ते सात हजार जागा उपलब्ध असून, त्या जागांवर पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली आहे. मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल यंदा घसरल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तुलनेत कमी होती. त्यामुळे पुरवणी परीक्षेसाठी २५ हजार विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यातील सहा हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांना अकरावीसाठी प्रवेशाची अंतिम संधी शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. अशी होईल प्रवेशफेरी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दि. ३ ते ७ सप्टेंबर दरम्यान माहिती पुस्तिका घेऊन त्यानुसार प्रवेश अर्ज करता येणार असून, दि. ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान महाविद्यालयांना राखीव कोट्याच्या रिक्त जागा समर्पित करावी लागणार आहे. त्यानंतर उपलब्ध रिक्त जागांवर दि. ९ सप्टेंबरपासून ६० टक्क्यांहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल, तर १३ सप्टेंबरपासून दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडण्याची संधी मिळणार असून, दि. १३ ते १४ सप्टेंबरदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. १६ सप्टेंबरला एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांना कॉलेज निवडण्याची संधी दिली जाणार असून, दि. १६ ते १७ सप्टेंबर दरम्यान प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकexamपरीक्षाSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी