शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
4
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
5
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
6
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
7
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
8
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
9
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
10
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
11
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
12
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
13
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
14
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
15
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
16
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
17
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
18
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
19
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
20
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
Daily Top 2Weekly Top 5

कामगार वस्तीतील मुलांना मिळणार रोजगाराची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:22 IST

सिडको : येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास यू.जी.सी. नवी दिल्ली यांच्याकडून व्यावसायिक कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम मंजूर झाले आहेत. त्यात फूड प्रोसेसिंग आणि इलेक्ट्रिकल अप्लायंसेस, मेंटेनन्स व रिपेअरिंग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. नाशिकमधील बहुतांश महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रम यांनाही मान्यता मिळाली असल्याने एकूणच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित व रोजगार संधी देणारे शिक्षण घेता येणार आहे.

ठळक मुद्देवावरे महाविद्यालयात कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम मंजूर

सिडको : येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास यू.जी.सी. नवी दिल्ली यांच्याकडून व्यावसायिक कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम मंजूर झाले आहेत. त्यात फूड प्रोसेसिंग आणि इलेक्ट्रिकल अप्लायंसेस, मेंटेनन्स व रिपेअरिंग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. नाशिकमधील बहुतांश महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रम यांनाही मान्यता मिळाली असल्याने एकूणच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित व रोजगार संधी देणारे शिक्षण घेता येणार आहे.सिडकोसारख्या कामगारवस्तीत आणि परिसरात अंबड-सातपूर-सिन्नर या औद्योगिक वसाहती असल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मुलांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. ६० टक्के प्रात्यक्षिक-कौशल्ये आणि ४० टक्के सामान्य शिक्षण अशी या अभ्यासक्रमाची विभागणी केलेली आहे. या योजनेंतर्गत प्रवेशासाठी वयाची कुठलीही अट नसून किमान शैक्षणिक पात्रता १२वी अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.या अभ्यासक्रमासाठी प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एम. एस. गिरासे, डॉ. पी. जी. लोके, डॉ. बाळासाहेब पगार, प्रा. अजय निकम, डॉ. राहुल पाटील, प्रा. राजेश झनकर आदींनी प्रयत्न केले. उपप्राचार्य डॉ. अ‍े. के. शिंदे, प्रा. डी. जी. शिंदे, कार्यालयीन अधीक्षक एस. बी. तांबे, आर. आर. गायकर, गणपत गडाख आदी कामकाज पाहत आहे.अनुदानासाठी प्रस्ताव सादरशासकीय धोरणानुसार आरक्षणाचा लाभही या प्रवेशित विद्यार्थ्यांना मिळणार आहे. वावरे महाविद्यालयाने दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव अनुदानासाठी सादर केलेला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सुरुवातीला ७५ लाख रुपयांचे अनुदान येणार असून, पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्याने उर्वरित रक्कम मिळणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण