सैन्य दलात करिअरची संधी
By Admin | Updated: January 9, 2016 00:17 IST2016-01-09T00:17:22+5:302016-01-09T00:17:34+5:30
रवींद्र वर्टी : वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी प्रतिपादन

सैन्य दलात करिअरची संधी
नाशिकरोड : स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले पाहिजे. तसेच सैन्यदलातही अधिकारी होण्यासाठी मोठी संधी आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त ब्रिगेडिअर अरविंद वर्टी यांनी केले.
पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालयाचे बक्षीस वितरण कार्यक्रमात वर्टी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष जयंत मोंढे होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य प्र. ला. ठोके, उपप्राचार्य प्रा. रेखा टर्ले, प्रा. प्रदीप वाघ, डॉ. शुभांगी कुलकर्णी, विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी बोराडे व शुभम रहाणे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयाने तयार केलेल्या तरूणाई अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक विद्यार्थिनी वैष्णवी बोराडे हिने केले. अहवाल विद्यार्थीनी रेश्मा खाटीक व क्रीडा अहवाल विद्यार्थी सौरभ महाजन याने सादर केला. सूत्रसंचालन प्रा. संगीता मुसळे व आभार प्रा. प्रतिमा औटी यांनी मानले.
यावेळी माजी प्राचार्य उदय शेवतेकर, प्रा. संगीता पवार, प्रा. कैलास निकम, प्रा. राजेंद्र शेळके, प्रा. गणेश खांबेकर, प्रा. सुनील हिंगणे, प्रा. श्रीकृष्ण लोहोकरे, प्रा. दीपक पर्वतीकर, प्रा. यशवंत सूर्यवंशी, प्रा. सुरेखा पवार, प्रा. राजेश खताळे, प्रा. प्रदीप वाघ, प्रा. माणिक भोये आदिंसह प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)