शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणाच्या पाणीप्रश्नावर विरोधकांचा दिखाऊपणा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:27 IST

जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने दिल्यानंतर जिल्ह्यात भाजपाचा अपवाद वगळता सर्वपक्षीय राजकीय आंदोलने होत असली तरी, या आंदोलनातून निघणारा एकूणच निष्कर्ष पाहता कोणतीही शासकीय यंत्रणा आपल्या अखत्यारित पाणी न सोडण्याचा निर्णय घेऊ शकत नसल्याने शेवटचे अस्त्र म्हणून त्यासाठी थेट राज्याचे सर्वेसर्वा मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालणे हाच पर्याय असल्याचे जाणकाराचे म्हणणे आहे.

नाशिक : जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने दिल्यानंतर जिल्ह्यात भाजपाचा अपवाद वगळता सर्वपक्षीय राजकीय आंदोलने होत असली तरी, या आंदोलनातून निघणारा एकूणच निष्कर्ष पाहता कोणतीही शासकीय यंत्रणा आपल्या अखत्यारित पाणी न सोडण्याचा निर्णय घेऊ शकत नसल्याने शेवटचे अस्त्र म्हणून त्यासाठी थेट राज्याचे सर्वेसर्वा मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालणे हाच पर्याय असल्याचे जाणकाराचे म्हणणे आहे. दुर्दैवाने सध्याचे आंदोलन पाहता ‘जखम पायाला व मलम डोक्याला’ लावण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका होऊ लागली आहे.  जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी पाटबंधारे महामंडळाने मंगळवारी जाहीर केल्यानंतर यासंदर्भात सर्वात प्रथम भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पाणी न सोडण्याची भूमिका घेत सर्वपक्षीय बैठक बोलावली असता, त्यात कॉँग्रेस वगळता सर्वपक्षीय आमदारांनी हजेरी लावली. त्यात न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याबरोबरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले. दोन्ही मार्ग योग्य असतानाही भाजपाला वगळून अन्य विरोधी पक्षांनी शहरात विविध मार्गांनी आंदोलने सुरू करून जिल्हाधिकारी तसेच पाटबंधारे खात्याला पत्रे देण्याचा सपाटा लावला आहे. रामकुंडात पाण्यात उतरण्याबरोबरच जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना घेराव घालण्यात आला आहे.  मुळात जिल्ह्यात राज्य सरकारातील एक मंत्री, सत्ताधारी पक्षाचे दोन खासदार, सत्ताधारी विरोधक मिळून पंधरा आमदार असून, या सर्वांनी पाणीप्रश्नावर पुढाकार घेऊन थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनाच साकडे घातल्यास त्यांची मध्यस्थीच नाशिकचे पाणी वाचवू शकणार आहे. न्यायालयाने जलदगतीने सुनावणी घेण्यास नकार दिला, तर पाटबंधारे महामंडळ जलसंपत्ती अधिनियम व उच्च न्यायालयाचा हवाला देत पाणी सोडण्यावर ठाम आहे, अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर आंदोलने करणे म्हणजे एक तर आंदोलकांना पाण्याच्या प्रश्नावर फक्त राजकारण करून भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्यातच रस असल्याचे दिसत आहे. अर्थात यात भाजपदेखील मागे नाही.राजकीय आंदोलनांचा फार्सगोदावरी महामंंडळाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे एवढेच शासकीय यंत्रणेच्या हाती असून, राजकीय पक्षांची आंदोलने व त्यांची निवेदने फक्त संबंधित विभागाकडे पोहोचविण्याची जबाबदारी आहे. ही वस्तुस्थिती आंदोलने करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही ठाऊक आहे, परंतु तरीही निव्वळ नाशिककरांचे तारणहार म्हणून दिखाऊपणा केला जात आहे.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणWaterपाणीMarathwadaमराठवाडाPoliceपोलिस