शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारीच बनले विरोधक

By किरण अग्रवाल | Updated: October 7, 2018 14:11 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याच्या नादात भाजपाचे पदाधिकारी आपण स्वत: सत्तेत असल्याचे विसरून विरोधकाची भूमिका पार पाडू लागल्याने खऱ्या विरोधकांना आणखी काय हवे? पण या शह-काटशहाच्या राजकारणात नाशिककरांच्या जिवावर बेतते आहे, हे मात्र दुर्दैवीच म्हणायला हवे.

ठळक मुद्देसत्ताधारी व पदाधिकारी म्हणून भाजपाचा वचक उरला नाही, हेच त्यातून निष्पन्न

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याच्या नादात भाजपाचे पदाधिकारी आपण स्वत: सत्तेत असल्याचे विसरून विरोधकाची भूमिका पार पाडू लागल्याने खऱ्या विरोधकांना आणखी काय हवे? पण या शह-काटशहाच्या राजकारणात नाशिककरांच्या जिवावर बेतते आहे, हे मात्र दुर्दैवीच म्हणायला हवे.नाशिक शहर व जिल्ह्यातही फैलावू पाहत असलेल्या साथीच्या रोगांनी नागरिक भयभीत झाले आहेत. डेंग्यूबाधितांची संख्या या वर्षात पाचशेपेक्षा अधिक झाली असून, गेल्या महिन्यात दोन मृत्युमुखी पडले आहेत. तर स्वाइन फ्लूचे दीडशेपेक्षा अधिक रुग्ण आढळले असून, सात जणांचा मृत्यू घडून आला आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनातर्फे बैठकांवर बैठका घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत; परंतु त्या पुरेशा पडताना दिसत नाहीत. अशात आयुक्त तुकाराम मुंढे ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम घेतात म्हणून त्यांना शह देण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनीही ‘महापौर तुमच्या दारी’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. खरे तर असे करण्यात नावीन्य काही नाहीच. यापूर्वीच्या महापौरांनी असे उपक्रम राबवून झाले आहेत; परंतु केवळ आयुक्तांना शह देण्यासाठीच त्याची योजना केली गेल्यामुळे स्वाभाविकच प्रश्नाची तड लावण्यापेक्षा प्रशासनावर आरोप करण्यात समाधान मानले जाताना दिसून येत आहे. त्यामुळे नाशिकरोड परिसरातील रुग्णालये व शाळांना दिलेल्या भेटीत व तेथे आढळलेल्या अव्यवस्थेबाबत प्रशासनाला आरोपीच्या पिंजºयात उभे करताना सदरचे प्रशासन सत्ताधारी म्हणून आपल्याला राबविता आले नाही याची कबुलीच जणू महापौरांनी देऊन टाकली. सत्ताधारी असूनही प्रशासन ऐकत नसेल व वारंवार प्रशासनाला कारवाईचे इशारे देण्याची वेळ येत असेल तर सत्ताधारी व पदाधिकारी म्हणून भाजपाचा वचक उरला नाही, हेच त्यातून निष्पन्न होणारे आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRanjana Bhansiरंजना भानसी