शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनसाठी तीन स्वतंत्र मदत कक्ष कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 01:04 IST

नाशिक : जिल्ह्यात सध्या सर्वत्र वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या व त्याप्रमाणे लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची पूर्तता संबंधित रुग्णालयांना त्यांच्या गरजेप्रमाणे त्वरित व्हावी, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक व मालेगाव महानगरपालिकेसह जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी स्वतंत्र मदत व माहिती कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे संपूर्ण व्यवस्थेचे संनियंत्रण महानगरपालिकेकडून

नाशिक : जिल्ह्यात सध्या सर्वत्र वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या व त्याप्रमाणे लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची पूर्तता संबंधित रुग्णालयांना त्यांच्या गरजेप्रमाणे त्वरित व्हावी, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक व मालेगाव महानगरपालिकेसह जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी स्वतंत्र मदत व माहिती कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.नाशिक मनपा हद्दीतील संपूर्ण व्यवस्थेचे संनियंत्रण महानगरपालिकेकडून केले जाणार असून, त्यासाठी नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त तर ग्रामीण भागाचे संनियंत्रण जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून डॉ. जेजुरकर यांच्याकडून केले जाणार आहे. मालेगाव महापालिका व लगतच्या परिसराचे संनियंत्रण मालेगावचे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडून केले जाणार आहे. प्रत्येक पुरवठादाराकडे उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून दर तीन तासांनी या तीन ही मदत व माहिती वाहिन्यांना उपलब्ध केली जाईल. त्या-त्या हद्दीतील रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत चौकशी करण्यासाठी मदत कक्षास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.सद्य:स्थितीत नाशिक जिल्ह्यात कोविडबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील पुरवठादाराकडे ज्याप्रमाणे टँकर प्राप्त होतील, तसे रुग्णालयांनी त्या-त्या पुरवठादारांशी संपर्क करून योग्य प्रमाणात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यामुळे दिवसभरात कोणत्या पुरवठादारांकडून ऑक्सिजन उपलब्ध आहे, त्याची माहिती रुग्णालयांना सुलभरीत्या व्हावी यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे.रुग्णालयांसाठी मदत क्रमांकनाशिक, मालेगाव महानगरपालिकांसह ग्रामीण भागाच्या मदत व माहिती कक्षांसाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. त्यात नाशिक महानगरपालिका हद्दीतील रुग्णालयांसाठी ०२५३ -२२२०८००, मालेगाव महानगरपालिका हद्दीतील रुग्णालयांसाठी ८९५६४४३०६८ आणि ८९५६४४३०७०, तर नाशिक ग्रामीण हद्दीतील रुग्णालयांसाठी ९४०५८६९९४० हे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाOxygen Cylinderऑक्सिजन