श्लोक कलाप्रदर्शनाचे उद्घाटन

By Admin | Updated: September 21, 2014 00:57 IST2014-09-20T20:31:50+5:302014-09-21T00:57:24+5:30

श्लोक कलाप्रदर्शनाचे उद्घाटन

Opening verse art exhibition | श्लोक कलाप्रदर्शनाचे उद्घाटन

श्लोक कलाप्रदर्शनाचे उद्घाटन

 

नाशिक : विविध विषयांना हात घालणाऱ्या आकर्षक चित्रांबरोबर शिल्पांना एकाच छताखाली आणत रसिकांना मेजवानी देणाऱ्या श्लोक प्रदर्शनाचे मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले.
तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बॅँक आॅफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजन लोंढे, उद्योजक हेमंत राठी, कथ्थक नर्तक मयूर वैद्य, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, त्रिशा रेअर क्राफ्टचे संचालक हर्षल नाईक, अनिल चौघुले, शैलेश कुटे, पंडित सोनवणी, आनंद सोनार, प्रसाद पवार, प्रफुल्ल सावंत, राजेश सावंत, राजा पाटेकर आदि उपस्थित होते. लोकमतच्या वतीने राज्यातील अनेक ठिकाणी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून कलावंतांना पुढे आणण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले असून, नाशिकमधील कलावंतांना प्रोत्साहन देणारा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उद्गार नीलिमाताई पवार यांनी काढले.
उद्योजक हेमंत राठी यांनीही या उपक्रमाचे कौतुक करीत कलावंतांना चांगले व्यासपीठ दिल्याचे उद्गार काढले. कथ्थक नर्तक मयूर वैद्य यांनी चित्रांमधून जास्त भावना व्यक्त होत असल्याचे सांगत लोकमतच्या वतीने आयोजित कार्यक्रमांना भेट देत असताना वेगळाच अनुभव येतो, असे सांगितले.
लोकमत आणि त्रिशा रेअर क्राफ्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाप्रदर्शनासाठी स्थानिक कलाकारांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नाशिक परिसरामधून दीडशेहून अधिक प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी निवडक ३५ कलाकृतींना या प्रदर्शनात स्थान मिळाले आहे.
उद्घाटन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नाशिककर रसिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. त्यात गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मालतीबाई कुलकर्णी विद्यालयातील विद्यार्थिनींसमवेत मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे, विनिता पवार, प्रीतेश गावित, प्रशांत अहिरे उपस्थित होते. त्रिशा हॉल, त्रिशा रेअर क्राफ्ट, बॉस्को सेंटर, प्रसाद सर्कलजवळ, गंगापूररोड येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ पासून ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्व रसिकांसाठी ते खुले राहणार आहे. या प्रदर्शनाला नाशिककर रसिकांनी भेट द्यावी आणि या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी प्रास्ताविक, तर वितरण विभागाचे पंकेश चंद्रात्रे यंनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Opening verse art exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.