शिवाजीनगर पादचारी पुुुलाचे लोकार्पण नागरिकांना पूल खुला : स्थानिकांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:11 IST2018-03-11T00:11:50+5:302018-03-11T00:11:50+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (माळवाडी) येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने चौपदरी रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पदचारी पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शिवाजीनगर पादचारी पुुुलाचे लोकार्पण नागरिकांना पूल खुला : स्थानिकांमध्ये समाधान
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (माळवाडी) येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने चौपदरी रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पदचारी पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पादचारी पूल झाल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
नाशिक-पुणे रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू होते. सिन्नर ते खेडपर्यंत रस्त्याचे काम गेल्या वर्षी पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने नागरिकांची व प्रवाशांची वेळेची बचत होत आहे. परंतु सिन्नर ते संगमनेर दरम्यान गावातून चारपदरी रस्ता गेल्याने अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या होत्या. स्थानिक रहिवाशांची अडचण लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने प्रायोजित योजनेतून तेथील परिस्थितीनुसार सुमारे ८८ लाख रुपये खर्च करून तीन महिन्यात पुलाचे काम पूर्ण केले आहे. सदर पुलाचा लोकार्पण सोहळा भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय आव्हाड, शांताराम पालवे, देवराम साबळे, भास्कर पालवे, महादू आव्हाड, दत्तात्रय आव्हाड, वसंत आव्हाड, पी़जी़ खोडसकर, सी़डी़ फकीर, श्रीक़े. लाल, संजय आव्हाड, शिवाजी आव्हाड, चंद्रकांत आव्हाड, एकनाथ आव्हाड, पंढरीनाथ आव्हाड, शांताराम पालवे, देवराम साबळे, भास्कर पालवे आदींसह ग्रामस्थ व राष्ट्रीय महामार्ग कर्मचारी उपस्थित होते.