‘नॅब’च्या ब्रेल लायब्ररीचे उद्घाटन
By Admin | Updated: February 15, 2017 00:19 IST2017-02-15T00:18:51+5:302017-02-15T00:19:03+5:30
‘नॅब’च्या ब्रेल लायब्ररीचे उद्घाटन

‘नॅब’च्या ब्रेल लायब्ररीचे उद्घाटन
नाशिक : नॅब महाराष्ट्र-अॅम्वे अॅपॉर्च्युनिटी फाउंडेशन ब्रेल लायब्ररीचे सातपूरच्या नॅब संकुल येथे मंगळवारी (दि.१४) सकाळी दिमाखात उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अॅम्वेचे क्षेत्रीय व्यवस्थापक जिग्नेश मेहता, कल्याणी पवार, दिलीप निकम, नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, महासचिव गोपी मयूर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदि मान्यवर उपस्थित होते. ब्रेल लिपीतील शैक्षणिक पुस्तके, फिक्शन, सेल्फ-हेल्प, जनरल नॉलेज आदि प्रकारांतील २०० पुस्तके आणि नियतकालिक यांची ब्रेल आवृत्तीतील पुस्तके व ६०० हून अधिक प्रकारची आॅडिओ सीडी प्रकारातली पुस्तके या लायब्ररीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंध व्यक्तींच्या कल्याणासाठी आम्ही अथक प्रयत्न करत आहोत. शिक्षण, ज्ञान हे शारीरिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन संधी निर्माण करण्यासाठी उज्ज्वल भविष्याची चावी आहे. ब्रेल लायब्ररी यासाठीच्या उपक्रमात महत्त्वाचा भाग आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्डच्या राज्यातील संस्थांसाठी अशा प्रकारच्या ३१ लायब्ररी तयार करण्याचा निर्धार केला असल्याचे जिग्नेश मेहता यांनी मनोगतात स्पष्ट केले. (प्रतिनिधी)