पावसाची उघडीप; मात्र वातावरण ढगाळच

By Admin | Updated: June 21, 2014 01:00 IST2014-06-20T22:25:15+5:302014-06-21T01:00:16+5:30

नाशिक : गुरुवारी (दि. १९) चांगली हजेरी लावणाऱ्या पावसाने शुक्रवारी मात्र उघडीप घेतल्याचे चित्र होते. सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते.

Open rain; But the atmosphere is cloudy | पावसाची उघडीप; मात्र वातावरण ढगाळच

पावसाची उघडीप; मात्र वातावरण ढगाळच

नाशिक : गुरुवारी (दि. १९) चांगली हजेरी लावणाऱ्या पावसाने शुक्रवारी मात्र उघडीप घेतल्याचे चित्र होते. सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. मात्र अधूनमधून सूर्यदर्शन होत होते. गेल्या २४ तासांत जिल्हाभरात ५१.२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जूनमध्ये हजेरी लावणाऱ्या मान्सूनने अद्यापही अपेक्षित हजेरी लावलेली नाही. याउलट एप्रिल व मेमध्येच बेमोसमी पाऊस व गारपिटीने जोरदार हजेरी लावल्याने शेतपिकांचे नुकसान झाले होते. दरवर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने यंदा मात्र पाठ फिरविल्याचे चिन्ह होते. गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या व जिल्ह्याच्या काही प्रमुख तालुक्यांत व गावांत पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने खरीप हंगामासाठी आशा उंचावल्या होत्या. त्यातच हवामान खात्याने यंदा अपेक्षित पर्जन्यमान होणार नसल्याचे जाहीर केल्याने बळीराजा धास्तावला होता. गेल्या २४ तासांत जिल्ह्णात अवघ्या ५१.२ मिलिमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. त्यात नाशिक- १.६ मि.मी., इगतपुरी- २३, दिंडोरी- ०२, पेठ- ०५, त्र्यंबकेश्वर- ०७, कळवण- २.८, सुरगाणा- ३.८, देवळा- ०६ अशी एकूण ५१.२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी १ ते २० जूनदरम्यान २६९६ मिलिमीटरची नोंद करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Open rain; But the atmosphere is cloudy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.