उघड्या विद्युत डीपीला युवासेनेने घातला हार
By Admin | Updated: July 30, 2016 00:59 IST2016-07-30T00:53:45+5:302016-07-30T00:59:14+5:30
गांधीगिरी : मुख्य अभियंत्यांना दिले निवेदन

उघड्या विद्युत डीपीला युवासेनेने घातला हार
नाशिकरोड : शिवसेनेच्या युवा सेनेतर्फे आर्टिलरी सेंटररोड आनंद ऋषी शाळेशेजारी असलेल्या उघड्या डीपी हार घालून पूजा करत गांधीगिरी मार्गाने महावितरण कंपनीचा निषेध नोंदवत मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना देण्यात आले. परिसरातील अनेक ठिकाणच्या विद्युत डीपीचे दरवाजे चोरीला गेल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, महावितरण कंपनीने त्वरित लक्ष घालून उघड्या डीपींना दरवाजे बसवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, परिसरातील अनेक रस्त्यावरील डीपींचे लोखंडी दरवाजे चोरीला गेले असून त्यातील वायरी उघड्यावर पडल्या आहेत. महावितरण कंपनीने लोंबकळणाऱ्या तारा, दरवाजे नसलेल्या विद्युत डीपी याबाबत विशेष खबरदारी घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर युवा सेनेचे उपशहर अधिकारी समर्थ मुठाळ, आकाश काळे, नीलेश शिरसाठ, दीपक ठाणगे, रोशन आढाव, प्रशांत कमळाकर, मयुर रहाणे, भूषण दुसाने, इम्रान शेख, स्वप्नील दाभाडे, विशाल जाधव आदिंसह युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)