कसबे सुकेणेसह नऊ गावांचा जुना रस्ता खुला करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:53+5:302021-09-04T04:18:53+5:30
कसबे सुकेणे : रस्त्याची वहिवाट हा नागरिकांचा नैसर्गिक अधिकार असून, तो हिरावून घेता येत नाही. त्यामुळे एच ए एल ...

कसबे सुकेणेसह नऊ गावांचा जुना रस्ता खुला करा
कसबे सुकेणे : रस्त्याची वहिवाट हा नागरिकांचा नैसर्गिक अधिकार असून, तो हिरावून घेता येत नाही. त्यामुळे एच ए एल प्रशासनाने सुकेणेकडे जाणारा रस्ता तातडीने खुला करावा, अन्यथा मामलेदाराच्या विशेष कायद्यांतर्गत कारवाई करून रस्ता खुला करण्यात येईल. यासंबंधी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार निफाड यांनी तत्काळ कारवाई करून लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी शुक्रवारी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार दिलीप बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच एच ए एल प्रशासन, निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे व संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सविस्तर माहिती जाणून घेत हा त्वरित खुला करून देण्याच्या एचएएल प्रशासनाला सूचना केल्या.
कोरोना विषयक सुरक्षेचे निमित्त देत एच ए एल प्रशासनाने मुंबई-आग्रा महामार्ग एच ए एल प्रवेशद्वार एक नंबर गेट ते मरीमाता गेट हा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून बंद केला आहे, त्यामुळे कसबे सुकेणे व पंचक्रोशीतील दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, भाऊसाहेब नगर, पिंपळस आदी गावांतील जनतेची कोंडी झाली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी, नागरिक, शालेय विद्यार्थी, नोकरदार यांना बाजारपेठेत जाण्याकरिता ओझर गावातून ये-जा करावी लागते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, नाशिक शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष शरद आहे, पंचायत समिती सदस्य बंडू आहेर, पिंपळसचे सरपंच तानाजी पूरकर, उपसरपंच विलास मत्सागर, कसबे सुकेणेचे उपसरपंच धनंजय भंडारे मौजे सुकेणेचे उपसरपंच सचिन मोगल, ओणेचे सरपंच संदीप कातकाडे, उपसरपंच शांताराम निसाळ, थेरगावचे सरपंच दत्तू बोराडे, उपसरपंच वंदना काळे, जिव्हाळेचे सरपंच किशोर पागेरे, दात्याने उपसरपंच सुनील पवार, दिक्षीचे सरपंच देविदास चौधरी, रमेश घुगे, नंदू सांगळे, भूषण धनवटे, रावसाहेब चौधरी आदी उपस्थित होते. (०३ सुकेणे २)
030921\1724-img-20210903-wa0044.jpg~030921\03nsk_22_03092021_13.jpg
एचएलएल ने कसबे सुकेणेकडे जाणारा रस्ता बंद केल्याने या विषयावर आयोजित बैठक प्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आमदार दिलीप बनकर व विविध गावांचे प्रतिनिधी~०३ सुकेणे २