शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजरोडला होणार एकेरी मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:03 IST

गजबजलेला कॉलेजरोड आणि त्यावरील वाहनांची गर्दी यातून बाहेर पडून चालण्याचा, प्रसंगी सायकलिंग तसेच शॉपिंगचा आनंद घेता येऊ शकतो. नाशिक सिटिझन फोरमने यासंदर्भात वेगळाच प्रयोग करण्याचा प्रस्ताव सादर केला असून, पादचारी शॉपिंग मार्ग केल्यास या भागातील वाहतूक समस्या सुटू शकते, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नाशिक : गजबजलेला कॉलेजरोड आणि त्यावरील वाहनांची गर्दी यातून बाहेर पडून चालण्याचा, प्रसंगी सायकलिंग तसेच शॉपिंगचा आनंद घेता येऊ शकतो. नाशिक सिटिझन फोरमने यासंदर्भात वेगळाच प्रयोग करण्याचा प्रस्ताव सादर केला असून, पादचारी शॉपिंग मार्ग केल्यास या भागातील वाहतूक समस्या सुटू शकते, असा विश्वास व्यक्त केला आहे.  कॉलेजरोड ही आधुनिक बाजारपेठ मानली जाते. कॉलेजसह शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लास त्याचबरोबर ब्रॅँडेड दुकाने, सराफ बाजार आणि खाद्यसेवा देणारी दुकाने, दोन मॉल्स, बहुपडदा चित्रपटगृहे, रुग्णालये आणि मुख्य रस्त्याला मिळणाºया अनेक लेन्स अन्य सारेच काही या मार्गावर आहे. तथापि, यामुळे या मार्गावर वाहतूकही मोठ्या प्रमाणात असते. त्यातून चालणे कठीण होते, वर अपघातही घडत असल्याने पोलिसांना कॉलेजरोडवर शिस्त पालनासाठी मोठी कसरत करावी लागते. त्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी महापालिकेने दुभाजक टाकून रस्त्याची वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला असला तरी हा उद्देश फार सफल झाला नाही. काही वर्षांपूर्वी पोलिसांनी त्यावर उपाय म्हणून कॉलेजरोड वन वे करण्याचा प्रयोग राबविला होता.  मात्र दुकानदार आणि नागरिक या दोहांनाही हा प्रयोग रूचत नव्हता मात्र आता विदेशातील काही मार्ग त्याचप्रमाणे महाराष्टÑातही महाबळेश्वरसारख्या ठिकाणी शॉपिंग करण्यासाठी केवळ जागा ठेवून वाहनांना मनाई करता येते, त्याच धर्तीवर नाशिक सिटिझन फोरमने पोलीस आयुक्तांडे प्रस्ताव सादर केला आहे. कॅनडा कॉर्नर ते कृषिनगर चौकापर्यंतच्या टप्प्याचा विचार करून हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. अनेक नवे पर्यायही उपलब्धकॅनडा कॉर्नरकडून एचपीटी कॉलेज (कृषिनगर चौक)पर्यंत जाणारा रस्ता हा बीग बाजारच्या बाजूने पादचारी आणि सायकलस्वार यांच्यासाठीच राखीव ठेवता येईल आणि त्यासमोरील म्हणजे मॅक्डोनल्ड््सकडील लेन ही वाहनांसाठी एकेरी मार्गी करता येईल. हा रस्ता आणि कॉलेजरोड परस्पर विरोधी दिशांनी एकमार्गी असावेत, असे सुचविण्यात आले आहे.   हे रस्ते परस्परांना पाटील लेनच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जोडले असल्याने कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, असा फोरमचा दावा आहे. प्रायोगिक तत्त्वावर किमान सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा प्रयोग राबविला तर त्यातून व्यवहार्यता पडताळता येईल आणि समस्या सुटताना अनेक नवे पर्यायही उपलब्ध होऊ शकतील, असे फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग यांनी सांगितले.पादचारी आणि सायकलींसाठी स्वतंत्र मार्ग तसेच काही मार्ग केवळ शॉपिंगसाठीच म्हणजे ठराविक काळात वाहनांना प्रवेश बंदची कल्पना विदेशात नव्हे, तर भारतातही रुजते आहे. या प्रकारामुळे बाजारपेठेवर कोणत्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम होत नाही उलट व्यापारपेठेला चालना मिळते. कॉलेजरोडच्या पाटील कॉलनी लेनमध्ये अनेक समांतर मार्ग असल्याने एकेरी मार्ग झाल्याने  कॉलेजरोडवरून जाणाºया वाहनचालकांना फार अडचण होईल असे वाटत नाही. शिवाय पार्किंगसाठी अनेक समांतर मार्ग असून, तेथे सम-विषम तारखांना पार्किंग करता येईल. शॉपिंग स्ट्रीटवर बसण्यासाठी बाक तसेच अन्य उपक्रम राबवून हा खºया अर्थाने हॅपी स्ट्रिट करता येऊ शकेल.  - सुनील भायभंग, अध्यक्ष,  नाशिक सिटिझन फोरम

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय