शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेकडून केवळ दुचाकी वाहनधारक टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:30 IST

वाहनांची कागदपत्रे नाही, हेल्मेट परिधान केलेले नाही तसेच पीयूसी नाही अशी विविध कारणे पुढे करून वाहतूक शाखेच्या वतीने शहरात सध्या केवळ दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसुलीची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पंचवटी : वाहनांची कागदपत्रे नाही, हेल्मेट परिधान केलेले नाही तसेच पीयूसी नाही अशी विविध कारणे पुढे करून वाहतूक शाखेच्या वतीने शहरात सध्या केवळ दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसुलीची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील बेशिस्त रिक्षाचालक थांबा नसताना रिक्षा थांबविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे तसेच अन्य चारचाकी वाहनचालक भररस्त्यात वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा करीत असले तरी त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याने वाहतुकीचे नियम केवळ दुचाकी वाहनधारकांसाठी आहे का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे. गत काही दिवसांपासून नाशिक शहरात सर्वत्र वाहतूक शाखेचे पोलीस व स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांकडून वाहन तपासणीच्या नावाखाली सर्वसामान्य दुचाकीवाहनधारकांना टार्गेट केले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर बेशिस्त रिक्षाचालकांची मुजोरी  शहरातील विविध मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांवर बेशिस्त रिक्षाचालकांकडून सर्रासपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, थांबा नसताना रिक्षा थांबविणे तर मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा परिसरातील रस्त्यावर चारचाकी उभ्या करणे, होळकर पुलावर चारचाकी वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करून सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली जात असली तरी वाहतूक शाखेकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.    ऐरवी रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली म्हणून पोलिसांकडून खाकीचा धाक दाखवून दुचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाइ केली जाते मग वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांच्या डोळ्यादेखत नियमांची पायमल्ली करणाºया वाहनचालकांना मोकळीक का असा सवाल नागरिकांनी केला आहे. शासनाच्या तिजोरीत महसुलाची रक्कम वाढावी यासाठी वाहतूक शाखा दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची सक्तीची मोहीम राबवित आहे. पोलीस व जनतेत वाद शासनाच्या तिजोरीत महसुलाची रक्कम वाढावी यासाठी वाहतूक शाखा दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची सक्तीची मोहीम राबवित आहे. त्यामुळे पोलीस व सर्वसामान्य जनता यांच्यात वाद होत असल्याचे चित्र आहे. वारंवार दुचाकीवर कारवाईमुळे दुचाकी चालवावी की नाही हा प्रश्न चालकांना पडत आहे. पोलीसांच्या या त्रासाचा नागरिकांना कंटाळा आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीस