शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ज्यांच्या भरवशावर एसटी त्यांनाच दिला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:21 IST

नाशिक- शहरात चालवली जाणारी बस वाहतूक तोट्यातच असते असे सांगून प्रवासी वाहतूक करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एसटीने यापूर्वी वर्षानुवर्ष याच प्रवाशांच्या भरवश्यावर ही सेवा चालवली आहे. आता राज्यात बहुतांशी महापालिका बस सेवा चालवत असल्या तरी राज्यात महामंडळ नफ्यात आहेच कोठे मग असे असताना प्रवाशांचे हित आणि सामाजिक बांधीलकी धाब्यावर बसवून व्यवसायिक वृत्तीने महामंडळाला काय साध्य झाले असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देतोट्याचे कारण: वर्षानुवर्ष कमवलेल्या नफ्याचे काय?

नाशिक- शहरात चालवली जाणारी बस वाहतूक तोट्यातच असते असे सांगून प्रवासी वाहतूक करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एसटीने यापूर्वी वर्षानुवर्ष याच प्रवाशांच्या भरवश्यावर ही सेवा चालवली आहे. आता राज्यात बहुतांशी महापालिका बस सेवा चालवत असल्या तरी राज्यात महामंडळ नफ्यात आहेच कोठे मग असे असताना प्रवाशांचे हित आणि सामाजिक बांधीलकी धाब्यावर बसवून व्यवसायिक वृत्तीने महामंडळाला काय साध्य झाले असा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्य परिवहन महामंडळाची मक्तेदारी सुरूवातीला ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात होती. १९९२ च्या अगोदर ही मक्तेदारी असताना महामंडळाला नफ्या तोट्याचे गणित कधी आठवले नाही आणि त्यानंतर मात्र शहरातील बसवाहतूक ही आपली जबाबदारी नाहीच, असे सांगून हात झटकण्यास महामंडळाने सुरूवात केली. त्यानंतर नाशिकसह अन्य महापालिकांना वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात येऊन ही जबाबदारी आमची नाहीच असे ठसविण्याची नाहीच असे इशारे देण्यास सुरूवात झाली. महामंडळाची सूत्रे उत्तमराव खोब्रागडे यांच्याकडे असताना तर थेट वृत्तपत्रात नोटिसा देऊन आता बस सेवा चालविणार नसल्याचे निर्वाणीचे इशारे देण्यात आले. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्यांना रोखल्याने नाशिक शहरात तरी त्यांच्या इशाºयांचा काही परिणाम झाला नाही आता महापालिका राजकिय दबावामुळे ही सेवा चालविण्यास तयार झाली असताना त्याच्या सेवेची प्रतिक्षा न करताही बस सेवाच सुरू करायची नाही, इतकीमुजोरी महामंडळ का करीत आहे, असा प्रश्न आहे.नाशिक शहरात खासगी वाहनांची संख्या वाढली हे प्रवाशी घटण्याचे कारण सांगितले जात असले तरी शहरबा' सेवेत देखील खासगी सेवेचे आव्हान नाही काय, मग तेथे सेवा बंद करणे शक्य आहे काय, असाही प्रश्न केला जात आहे.मुळातच ही प्रवाशासाठी बस सेवा चालवणे ही एकमेव जबाबदारी महामंडळाकडे आहे. महापालिकांकडे रस्ते,पाणी, गटारी ही सर्व मुलभूत सेवांची कामे आहे. ती करता करता त्यांना नाकीनव येतात अशास्थितीत ते बस सेवा चालविण्यास तयार असताना त्याची वाट न बघता शहरात बस सेवाच चालविणा-यास नकार देणा-या महामंडळाच्या कारभाराची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे.महामंडळाने शहर बस वाहतूक बंद करण्यासाठी लॉक डाऊन हे निमित्त शोधले असले तरी यापूर्वी ही सेवा बंद करण्यासाठी किंवा नागरीकांनी तक्रारी ही सेवा महापालिकेस सुरू करण्यास भाग पाडावे यासाठी अनेक भागातील बस फे-याच बंद केल्या. शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातून येणा-या नागरीकांचे त्यामुळे हाल झाले. विद्यार्थ्यांना कॉलेजला जाणे अडचणीचे ठरले. पासचे पैसे भरूनवाया गेले. शहरातल्या उपनगरात अनेक भागात फ्रिक्वेंसी कमी केली. त्यामुळे नागरीकांचे हाल झाले. प्रवाशांची सोय नव्हे तर जाणिवपूर्वक हाल करणा-या महामंडळाची सेवा तरी नक्की कोणासाठी चालते असाही प्रश्न आता प्रवासी करीत आहेत.

 

 

टॅग्स :Bus Driverबसचालकcorona virusकोरोना वायरस बातम्या