शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातक्षम द्राक्षांवर प्रमाणित औषधांचीच फवारणी करा ; तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 19:54 IST

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर या हंगामात अधिक पाऊस झाल्याने वातावरणात अधिक बाष्पनिर्मिती होऊन डावणी आणि भुरीसह विविध कीटक आणि अळी नियंत्रणाचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकºयांनी छाटणीनंतर हंगाम सुरू होण्यापूर्वी जैविक औषधांचा व द्राक्षनिर्यासाठी प्रमाणित औषधांचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक असून, विविध प्रकारच्या कीटक नियंत्रणासाठी सापळ्यांचा अधिकाधिक वापर करण्याचा सल्ला राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञांनी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना दिला आहे.

ठळक मुद्देद्राक्ष उत्पादकांनी जैविक औषधांचा वापर करावाकिटक नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर करावा

नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर या हंगामात अधिक पाऊस झाल्याने वातावरणात अधिक बाष्पनिर्मिती होऊन डावणी आणि भुरीसह विविध कीटक आणि अळी नियंत्रणाचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी छाटणीनंतर हंगाम सुरू होण्यापूर्वी जैविक औषधांचा व द्राक्षनिर्यासाठी प्रमाणित औषधांचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक असून, विविध प्रकारच्या कीटक नियंत्रणासाठी सापळ्यांचा अधिकाधिक वापर करण्याचा सल्ला राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञांनी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना दिला आहे. द्राक्ष उत्पादकांना शेती क्षेत्रातील विविध आव्हाने सध्या भेडसावत आहेत. उत्पादन ते विक्री यामध्ये येणाऱ्या समस्यांवर मंथन करण्यासाठी नाशिक विभागीय द्राक्ष बागायतदार संघातर्फे  मंगळवारी (दि.१७) दादासाहेब गायकवाड सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन करण्यासाठी द्राक्ष शेती आणि संशोधन केंद्रातील मान्यवरांनी द्राक्ष विक्रीची सद्यस्थिती व भविष्यातील विक्री व्यवस्था, छाटणी ते फळधारणा व थंडीमध्ये द्र्राक्षाच्या आकाराविषयी करावयाच्या उपाययोजना, यशस्वी ग्राफटिंगचे तंत्र, द्राक्षबागेतील नवीन कीड व त्याचे नियंत्रण, द्राक्षबागेतील नवीन बुरशीजन्य रोग व त्यांचे नियंत्रण, जास्त पर्जन्यमानामध्ये द्र्राक्षवेली पोषणावर होणारे परिणाम, संजीवकांचा अतिवापर व त्याचे परिणाम तसेच येणाºया द्राक्ष हंगामाचा आढावा या विषयांवर सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, विजय जाधव, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुवर, डॉ. दीपेंद्र सिंग यादव, डॉ. ए. के. उपाध्याय, डॉ. एस. डी. रामटेके व स्कायमेंटचे हवामान तज्ज्ञ योगेश पाटील याविषयी मार्गदर्शन केले. द्राक्ष उत्पादक संघाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी प्रास्ताविक  केले. यावेळी मानद सचिव अरुण मोरे व कोषाध्यक्ष कैलास भोसले यांच्यासह माजी विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील उपस्थितीत होते. दरम्यान, द्राक्ष शेतीत उल्लेखनीय काम करणाºया ज्योत्स्ना दौंड, रूपाली बोरगुडे यांच्यासह संघाचे सभासद सुरेश कमानकर व हेमंत पिंगळे यांना राज्य शासनाच्या कृषी विभागाचा कृषिभूषण पुरस्कार मिळल्याबद्दल सत्कार करण्यात आला.  समस्या गांभीर्याने घेण्याजी गरजद्राक्ष उत्पादक शेतीसमोर सध्या अनेक आव्हाने आहे. त्यामुळे सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकºयांच्या समस्या गांभीर्याने घेण्याची गरज असून, शेती क्षेत्रातील विविध योजनांचा द्राक्ष बागायतदार शेतकºयांनाही लाभ देण्याची गरज असल्याचे मत नाशिक विभागीय द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकFarmerशेतकरी