एकलहरे रस्ता बनला डम्पिंग रोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:14 IST2021-05-19T04:14:36+5:302021-05-19T04:14:36+5:30

रुग्णालयातील मंडप कोसळला नाशिक : बिटकाे रुग्णालयात ओपीडीसाठी येणाऱ्या नागरिकांना सावली मिळावी यासाठी ओपीडीसमोर मंडप उभारण्यात आला होता. मात्र, ...

The only road became a dumping road | एकलहरे रस्ता बनला डम्पिंग रोड

एकलहरे रस्ता बनला डम्पिंग रोड

रुग्णालयातील मंडप कोसळला

नाशिक : बिटकाे रुग्णालयात ओपीडीसाठी येणाऱ्या नागरिकांना सावली मिळावी यासाठी ओपीडीसमोर मंडप उभारण्यात आला होता. मात्र, सोमवारी झालेल्या पावसामुळे मंडप पूर्णपणे पडला असून, मोठ्या प्रमाणात नुकसानदेखील झाले आहे. या ठिकाणी पुन्हा मंडप उभारला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

त्र्यंबक रोडवर झाड पडल्याने अडथळा

नाशिक : त्र्यंबक रोडवरील हॉटेल राजदूतसमोर एक गुलमोहराचे झाड रस्त्यावर पडल्याने काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या मार्गावर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यादेखील पडल्याच्या घटना घडल्या आहेत. टपाल कार्यालयासमोरदेखील झाडाच्या फांद्या पडल्याचे दिसून आले.

झाडांच्या फांद्यांमुळे गाड्यांचे नुकसान

नाशिक : जोरदार वाऱ्यामुळे पंडित कॉलनी परिसरातील रस्त्यांवर उभ्या असलेल्या अनेक चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. झाडाच्या फांद्या गाड्यांवर पडल्याने पत्रे वाकले, तर काही गाड्यांच्या काचादेखील फुटल्याचे परिरसरातील नागरिकांनी सांगितले.

Web Title: The only road became a dumping road