नाशिक-सिडकोत शिवजयंतीची एकच मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 07:31 PM2020-02-11T19:31:37+5:302020-02-11T19:31:57+5:30

सिडकोत शिवजयंती साजरी करण्यावरून दोन समिती जाहिर झाल्या होत्या, एका समितीच्या अध्यक्षपदी विजय पाटील तर दुसऱ्या समितीच्या अध्यक्षपदी भुषण कदम यांची निवड जाहिर करण्यात आली त्यामुळे सिडकोत शिवजयंती निमित्त दोन अध्यक्ष जाहीर झाल्यानंतर कार्यकत्यांमध्ये संभ्रम निर्माण

The only procession of Shiv Jayanti is at Cidco | नाशिक-सिडकोत शिवजयंतीची एकच मिरवणूक

नाशिक-सिडकोत शिवजयंतीची एकच मिरवणूक

Next
ठळक मुद्देअध्यक्षपदी भुषण कदम : महिलांनाही संधी

लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : सिडकोत यंदा शिवजन्मोत्सवासाठी एकच शिवजयंती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यंदा संपुर्ण सिडकोतील सर्व मित्रमंडळे मिळून एकच भव्य दिव्य मिरवणूक काढण्याचे ठरविण्यात आले. सिडको सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी भुषण कदम तर महिला मंडळ अध्यक्षपदी नगरसेविका हर्षा बडगुजर व नगरसेविका किरण गामणे दराडे यांची निवड करण्यात आली.


सिडकोत शिवजयंती साजरी करण्यावरून दोन समिती जाहिर झाल्या होत्या, एका समितीच्या अध्यक्षपदी विजय पाटील तर दुसऱ्या समितीच्या अध्यक्षपदी भुषण कदम यांची निवड जाहिर करण्यात आली त्यामुळे सिडकोत शिवजयंती निमित्त दोन अध्यक्ष जाहीर झाल्यानंतर कार्यकत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर सिडकोतील साईबाबा नगर येथे सामाजिक कार्यकर्ते संजय भामरे व नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली. यावेळी पाटील यांनी माघार घेतली. त्यानंतर सिडको सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती २०२० ची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यात समितीच्या अध्यक्षपदी भुषण कदम, उपाध्यक्ष पदी गोरख शिंदे, कुणाल गोसावी, राहुल गणोरे, अतुल जाधव, स्वप्नील नेटावणे, बाळासाहेब गिते, कार्यध्यक्षपदी पवन कातकाडे, गणेश अरिंगळे, खजिनदारपदी अमर वझरे, सरचिटणीसपदी अर्जुन वेताळ, गोरव केदारे, संजय जाधव, पवन मटाले, विशाल पगार, आबा पाटील, भास्कर सांळूखे, दिपक भोगे चिटणीसपदी प्रदिप चव्हाण, चेतन हांडगे, हर्षल चव्हाण, सागर खराडे, सुयश पाटील, शुभम महाले,पप्पु पाटील, सुयश देवरे, सहचिटणीसपदी मुकेश शेवाळे, युवराज दराडे, नितीन माळी, संदेश जगताप, पंकज वाघ, अक्षय खांडरे, नाना ठोंबरे व प्रसिध्दी प्रमुखपदी योगेश गांगुर्डे तर महिला समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविका हर्षा बडगुजर, नगरसेविका किरण गामणे दराडे, उपाध्यक्षपदी नगरसेविका छाया देवांग, मनिषा हिरे, कार्याध्यक्षपदी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, नगरसेविका कल्पना पांडे, सरचिटणीसपदी सोनल मंडलेचा यांची निवड जाहिर करण्यात आली तर मार्गदर्शक म्हणुन आमदार सीमा हिरे, मविप्रचे संचालक नाना महाले, नगरसेवक सुधाकर बडगुजर, डि.जी. सुर्यवंशी, शामकुमार साबळे, निलेश ठाकरे, प्रविण तिदमे, प्रतिभा पवार, राजेंद्र महाले, धनाजी लगड आदी नगरसेवकांसह माजी नगरसेवक आण्णा पाटील, मामा ठाकरे, डॉ. सुभाष देवरे, दत्ता पाटील, बाळासाहेब पाटील, संतोष सोनपसारे, अंकुश वराडे, वैभव देवरे,विजय पाटील, रोशन घाटे, आशिष हिरे यांची निवड करण्यात आली.

 

Web Title: The only procession of Shiv Jayanti is at Cidco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.