शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीचोरी रोखली, तरच विसर्ग शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:22 IST

चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधारा-यातील अनधिकृत पाणी उचलणाºया मोटारी काढून टाकल्याशिवाय दारणा धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, भरारी पथकाने ३० अनधिकृत पंप जप्त करण्याची कारवाई केली.

भगूर : चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधारा-यातील अनधिकृत पाणी उचलणाºया मोटारी काढून टाकल्याशिवाय दारणा धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, भरारी पथकाने ३० अनधिकृत पंप जप्त करण्याची कारवाई केली.चेहेडी आणि लष्करी हद्दीतील बंधाºयातून ज्या परिसरांना पाणीपुरवठा केला जातो तेथे आता पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे औद्योगिक विकास मंडळ संस्थेने दारणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केलेली आहे. दुसरीकडे पाणीचोरीच्या प्रकारामुळे बंधाºयातील पाणीसाठी कमी होत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी जलसंपदा विभागासोबत पाणीवापर संस्थेचे सहकार्याने भरारी पथक नेमले आहे. त्यामध्ये जलसंपदा विभाग पी. एम. कुलकर्णी, आर. जी. सोनवणे, शेख वाणी, नाशिक मनपाचे डी. एल. खेलूकर, ए. टी. यंदे, भगूर पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, रवींद्र संसारे, सिन्नर पालिका मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे डी. जे. सोनजे, महेंद्र कराटे, फकीर उगले, पूर्वा माळी आदींनी चेहेडी ते साउथ देवळाली नदीच्या काठावर सर्व गाव परिसरात पाहणी करून अनेक मोटारी जप्त करून पंप काढण्यात आले. जोपर्यंत पाणी दुष्काळी परिस्थिती आहे तोपर्यंत दिवस-रात्री भरारी पथक कारवाई करत राहणार असल्याने शेतकºयांनी पाणी चोरण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाणार आहे.दोन दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लकजिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यानंतर भरारी पथकाने तत्काळ कारवाई करीत अनधिकृत वापर करणाºया शेतकºयांना दणका दिला आहे. त्यांचे कृषिपंप तसेच स्टार्टरदेखील तोडून टाकले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दारणा नदी कोरडी आहे, तर नाशिकरोेड, चेहेडी व देवळाली लष्करी बंधाºयात दोन दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक राहिले असल्यामुळे नाशिक महापालिका, भगूर-सिन्नर नगरपालिका औद्योगिक विकास मंडळासह विविध गावांतील संस्थांनी दारणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी करताच जिल्हाधिकाºयांनी बैठक घेऊन अनधिकृत वापराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.

टॅग्स :riverनदीWaterपाणी