खमताणे औद्योगिक वसाहतीचे केवळ स्वप्नच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 07:08 PM2019-09-24T19:08:05+5:302019-09-24T19:08:29+5:30

खमताणे : बागलाण तालुक्यातील खमताणे येथील औद्योगिक वसाहतीचा बोर्ड अनेक वर्षांपासून कंधाणे फाट्यावर व खमताणे गावात अडगळीत उभा असून या ठिकाणी एमआयडीसी सुरु होणार हे एक स्वप्नच ठरले आहे. बोर्डाच्या दुर्दशेप्रमाणे खमताणे ग्रामस्थांच्या स्वप्नांचीही दुर्दशा झाली आहे. गत २० वर्षापासून हा प्रश्न कोणीही तडीस नेलेला नाही. निवडुन येणाºया लोकप्रतिनिधींनी अथवा शासकीय अधिकाऱ्यांनी सुध्दा या प्रश्नी लक्ष्य दिलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात औद्योगिक वसाहत अमलात येण्यासाठी आज पर्यंत कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत.

The only dream of an industrialized colony | खमताणे औद्योगिक वसाहतीचे केवळ स्वप्नच

औद्योगिक वसाहतीचा जीर्ण झालेला फलक.

Next
ठळक मुद्देउदासिनता : लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून २० वर्षांपासून दुर्लक्ष्य

खमताणे : बागलाण तालुक्यातील खमताणे येथील औद्योगिक वसाहतीचा बोर्ड अनेक वर्षांपासून कंधाणे फाट्यावर व खमताणे गावात अडगळीत उभा असून या ठिकाणी एमआयडीसी सुरु होणार हे एक स्वप्नच ठरले आहे. बोर्डाच्या दुर्दशेप्रमाणे खमताणे ग्रामस्थांच्या स्वप्नांचीही दुर्दशा झाली आहे.
गत २० वर्षापासून हा प्रश्न कोणीही तडीस नेलेला नाही. निवडुन येणाºया लोकप्रतिनिधींनी अथवा शासकीय अधिकाऱ्यांनी सुध्दा या प्रश्नी लक्ष्य दिलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात औद्योगिक वसाहत अमलात येण्यासाठी आज पर्यंत कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वसाहतीविषयी कोणतेही नोंदणीकृत माहिती नाही. ही वसाहत मुळातच शासनदरबारी अस्तित्वात नाही, तर तिचे स्वप्न का दाखविले जात आहे. असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे. औद्योगिक वसाहतीसाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय जागा उपलब्ध आहे.
गिरणा व केळझर मधुन एमआयडीसीकरीता पाणी उपलब्ध होऊ शकते. येथे मोठ्या प्रमाणावर प्रकिया उद्योग उभे राहु शकतात. त्यासाठी लागणारे कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. तालुक्यात नेहमीच सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदार निवडून आले तरी कोणी ही हा प्रश्न आस्थेने धसास लावणे दुर साधी दखल सुध्दा घेतलेली नाही.
औद्योगिक वसाहत अस्तित्वात आली तर तालुक्याचा कायापालट होवून, तरूणांना रोजगार मिळेल, आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. असे वाटते मण त्याला अद्याप मुहूर्त लागत नाही हे ग्रामस्थांचे दुदैवच म्हणावे लागेल.

Web Title: The only dream of an industrialized colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.