जिल्ह्यात रविवारी एकमेव मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 01:00 AM2021-01-11T01:00:02+5:302021-01-11T01:00:53+5:30

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण नवीन वर्षात कमी होताना दिसत असतानाच मृत्युचे प्रमाणदेखील हळूहळू कमी होऊ लागले आहे. रविवारी (दि. १०) जिल्ह्यात २१३ रुग्ण कोरोनामुक्त तर १८५ रुग्ण नव्याने बाधित झाल्याचे आढळले आहे.

The only death in the district on Sunday | जिल्ह्यात रविवारी एकमेव मृत्यु

जिल्ह्यात रविवारी एकमेव मृत्यु

Next

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण नवीन वर्षात कमी होताना दिसत असतानाच मृत्युचे प्रमाणदेखील हळूहळू कमी होऊ लागले आहे. रविवारी (दि. १०) जिल्ह्यात २१३ रुग्ण कोरोनामुक्त तर १८५ रुग्ण नव्याने बाधित झाल्याचे आढळले आहे. दरम्यान काल नाशिक ग्रामीणला एकमेव नागरिकाचा मृत्यु झाला असून त्यामुळे बळींची संख्या २०११ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १२ हजार ४७८ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ८ हजार ७९५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,६७२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.७३ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.२७, नाशिक ग्रामीण ९६.१०, मालेगाव शहरात ९३.०८, तर जिल्हाबाह्य ९३.८६ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ५६ हजार ७८२ असून, त्यातील ३ लाख ४३ हजार २७७ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १२ हजार ४७८ रुग्ण बाधित आढळून आले आहे.

Web Title: The only death in the district on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.