शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

‘कोरोना वॉरियर्स’साठी टाळ्या वाजविणारे हातच जेव्हा मागे हटतात...

By अझहर शेख | Updated: May 7, 2020 19:38 IST

‘त्या’ कोरोना योद्धयाचे पत्र ट्टिवटरवर वाचल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तत्काळ नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना यासंदर्भात ‘कृपया लक्ष द्यावे’ अशी विनंती ट्टिवटरद्वारेच केली आहे.

ठळक मुद्देआदित्य ठाकरेंकडून नांगरे पाटलांना लक्ष देण्याची विनंती‘त्या’ कोरोना योद्धयाच्या पुत्रांची थेट अमेरिकेतून खंत

नाशिक : इन योद्धाओं की करो देखभाल, तो देश जीतेगा हर हाल... असे सातत्याने आवाहन केले जात आहे; मात्र अद्यापही या आवाहनाचा फारसा परिणाम जनसामन्यांमध्ये दुर्दैवाने दिसून येत नाही. काही दिवसांपुर्वी ज्या हातांनी टाळ्या वाजवून कोरोनाशी दोन हात करणाऱ्यांचे आभार मानले आता तेच हात ‘त्या’ कोरोना योद्धयाच्या मदतीला पुढे येत नसल्याची खंत शहरातील एका डॉक्टरच्या पुत्राने थेट अमेरिकेतून सोशलमिडियावर एका पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून देशासह राज्य कोरोनासारख्या जीवघेण्या संकटाचा मुकाबला करत आहे. या संकटाशी तोंड देण्यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणेचे सर्व डॉक्टर, परिचारिका अहोरात्र झटत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी पोलीस दलदेखील युध्दपातळीवर रस्त्यांवर रणरणत्या उन्हात अन् रात्रीच्या अंधारात पहारा देत आहेत. जेणेकरून कोरोनाची वाढत जाणारी साखळी कुठेतरी तोडता येणे शक्य होईल, मात्र नाशिक शहरासह जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा आजार नियंत्रणात येतानाची चिन्हे आकड्यांवरून दिसत नाही. अशा महाभयंकर संकटात थेट आपला जीव धोक्यात घालून जनतेला सेवा देणा-या डॉक्टर, पोलिसांवर कुठे जनसामान्यांकडून पुष्पवृष्टी केली जात आहे, तर कोठे त्यांचे औंक्षणही होत आहे. एवढेच नव्हे तर या ‘कोरोना वॉरियर्सला’ भारतीय सेनेच्या तीनही दलांनीदेखील ‘सॅल्यूट’ केला आहे.
तरीदेखील काही जनसामान्यांमध्ये अद्यापही कोरोनाविषयीच्या भीतीपोटी का होईना ‘कोरोना वॉरियर्स’विषयी द्वेषाची भावना दिसून येते. शहरातील एका डॉक्टरच्या घरातच विलगीकरणाबाबत असाच एक प्रकार समोर आल्याचे त्यांच्या पुत्राने लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट झाले. ते डॉक्टर कोरोनाशी दोन हात करताना त्यांना कोरोनाची बाधा कधी झाली हे त्यांनाही लक्षात आले नाही. जेव्हा त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तेव्हा त्यांना तत्काळ त्यांना कोरोना कक्षातच उपचारार्थ दाखल केले गेले. त्यांची प्रकृती अत्यंत स्थिर असून त्यांना कुठल्याहीप्रकारची लक्षणे जाणवत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या राहत्या सोसायटीच्या सदनिकेतच सर्वतोपरी खबरदारी घेत अलगीकरण करण्यास मात्र तेथील स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. या योद्धयाच्या मदतीला संकटसमयी धावून येण्याऐवजी जनसामान्यांकडून विरोधाची भूमिका घेतली जात असल्याने त्यांच्या पुत्राने अमेरिकेतून लिहिलेल्या पत्रात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याने पत्रात म्हटले आहे की, आम्ही अमेरिकेत असून असह्य आहोत, आमच्या आईलादेखील क्वारंटाइन केले गेले आहे, भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार घरात आवश्यक त्या सोईसुविधा असल्यास तेथे योग्य ती खबरदारी घेत अलगीकरण रुग्णाचे करता येऊ शकेल’ मात्र त्यासदेखील हरकत घेतली जात असून सरकारी नियमांचाही भंग होत असल्याचे त्याने अधोरेखित केले आहे.पत्राचे ट्विट पंतप्रधानांनाही ‘टॅग’या कोरोना योद्धयच्या पुत्राने लिहिलेली इंग्रजीतून पत्र ट्टिवटरवर पोस्ट केले आहे. या ट्टिवटमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून विविध मंत्र्यांसह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनाही त्यांच्या ट्टिवटर हॅन्डलवर ‘टॅग’ केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयHealthआरोग्यdoctorडॉक्टर