देवळा : नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी विद्यमान नगराध्यक्षा ज्योत्स्ना संजय अहेर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची पुढील कालावधीसाठी नगराध्यक्षा म्हणून निवड निश्चित झाली आहे.देवळा नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण निघाल्याने अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी देवळा विकास आघाडीच्या ज्योत्स्ना अहेर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. निर्धारित वेळेत अहेर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची दि. ३० रोजी होणाऱ्या विशेष बैठकीत नगराध्यक्ष म्हणून घोषणेची फक्त औपचारिकता बाकी आहे. यावेळी देवळा विकास आघाडीचे प्रवर्तक व जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब अहेर, गटनेते अशोक अहेर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
नगराध्यक्षपदासाठी देवळ्यात अहेर यांचा एकमेव अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:46 IST
देवळा : नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी विद्यमान नगराध्यक्षा ज्योत्स्ना संजय अहेर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची पुढील कालावधीसाठी नगराध्यक्षा म्हणून निवड निश्चित झाली आहे.
नगराध्यक्षपदासाठी देवळ्यात अहेर यांचा एकमेव अर्ज
ठळक मुद्देपुढील कालावधीसाठी नगराध्यक्षा म्हणून ज्योत्स्ना अहेर