अटी मान्यतेनंतरच ‘स्मार्ट सिटी’
By Admin | Updated: December 14, 2015 23:53 IST2015-12-14T23:53:04+5:302015-12-14T23:53:04+5:30
मनसेचा यू-टर्न : पंधरा अटींच्या माध्यमातून ‘एसपीव्ही’ची नाकाबंदी

अटी मान्यतेनंतरच ‘स्मार्ट सिटी’
नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत ‘एसपीव्ही’तील त्रुटी दूर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर ‘यू-टर्न’ घेतल्याने नाशिक महापालिकेतही वेगवान घडामोडी होऊन सायंकाळी उशिरा सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत महापौरांनी ‘एसपीव्ही’ला सशर्त पाठिंबा दर्शविला. पंधरा अटींच्या माध्यमातून ‘एसपीव्ही’ची नाकाबंदी करणारा ठराव उपसूचनांसह तयार करण्यात येऊन त्यावर गटनेत्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. या ठरावामुळे आता प्रशासनाकडून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी मनपाने लादलेल्या अटी शासनाने मान्य केल्यानंतरच ‘स्मार्ट सिटी’त नाशिकचा सहभाग निश्चित होणार आहे.
सोमवारी पुणे महापालिकेच्या महासभेने अटी-शर्ती लादून स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर पुण्यापाठोपाठ नाशिक महापालिकेनेही त्याचेच अनुकरण करत ‘एसपीव्ही’ला सशर्त पाठिंबा दर्शविला. तत्पूर्वी, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर आपल्या भूमिकेत यू-टर्न घेतल्याने नाशिक महापालिकेतही स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाचा मार्ग मोकळा होण्याची चर्चा सुरू झाली. सायंकाळी महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. बैठकीला महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, सभागृहनेते सलीम शेख, विरोधी पक्षनेत्या प्रा. कविता कर्डक, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, मनसेचे अनिल मटाले यांच्यासह