शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

शहरात आपट्याचे अवघे १५३ वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:45 IST

चार दिवसांवर दसरा सण येऊन ठेपला आहे आणि दसºयाला सोने म्हणून आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. महापालिकेच्या वतीने सध्या सुरू असलेल्या वृक्ष गणनेत शहरात आपट्याची १५३ झाडे आढळून आली आहेत. दसºयाला या वृक्षाच्या फांद्या अक्षरश: ओरबडल्या जातील. निर्दयपणे त्यावर कुºहाड चालविली जाईल. त्यामुळे फेबु्रवारी-मार्चमध्ये बहर येणारा हा वृक्ष बोडका, खुरटलेलाच असतो. संस्कृतमध्ये ‘वनराज’ म्हणून गौरविला गेलेला हा वृक्ष आयुर्वेदिकदृष्ट्या औषधी म्हणून गणला जातो.

नाशिक : चार दिवसांवर दसरा सण येऊन ठेपला आहे आणि दसºयाला सोने म्हणून आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. महापालिकेच्या वतीने सध्या सुरू असलेल्या वृक्ष गणनेत शहरात आपट्याची १५३ झाडे आढळून आली आहेत. दसºयाला या वृक्षाच्या फांद्या अक्षरश: ओरबडल्या जातील. निर्दयपणे त्यावर कुºहाड चालविली जाईल. त्यामुळे फेबु्रवारी-मार्चमध्ये बहर येणारा हा वृक्ष बोडका, खुरटलेलाच असतो. संस्कृतमध्ये ‘वनराज’ म्हणून गौरविला गेलेला हा वृक्ष आयुर्वेदिकदृष्ट्या औषधी म्हणून गणला जातो. त्यामुळे, शहरात आपट्याच्या वृक्षांची मोजकी संख्या पाहता त्यावर कुºहाड चालविण्याऐवजी आपट्याचे रोप वाटून दसºयाचे सोने लुटता येईल काय, असा प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे.  दसरा अर्थात विजयादशमीला सोने म्हणून आपटा वृक्षाची पाने वाटण्याची प्रथा पूर्वापारपासून चालत आलेली आहे. त्याबाबतचे संदर्भ रामायण-महाभारतातही दिले जातात. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शहरात आपटा वृक्षाची पाने प्रामुख्याने, आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येतात.  या पानांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांची कमाई होत असली तरी, आयुर्वेदियदृष्ट्या बहुगुणी औषधी वनस्पती असलेल्या या वृक्षाला अक्षरश: ओरबाडले जाते. त्यामुळे या वृक्षाची प्रजातीही कमी कमी होत चालल्याचा दावा वनस्पतीतज्ज्ञ करत आले आहेत. नाशिक शहरात सध्या महापालिकेच्या वतीने वृक्ष गणना सुरू आहे. आतापर्यंत १८ लाख ६६ हजार वृक्षांची गणना झालेली आहे. त्यात, आपटा वृक्षांची संख्या अवघी १५३ इतकी आढळून आली आहेत.  या वृक्षाचे जतन होण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. आपटा या वृक्षाला ‘अश्मंतक’ म्हणजे दगडांचा, खडकांचा नाश करणारा, असेही म्हटले जाते. त्यामुळे मूतखडा तसेच पित्त व कफदोषांवर हा वृक्ष उपयुक्त  मानला जातो. उष्मांक मूल्य भरपूर असल्याने सरपण, इंधनासाठीही त्याचा उपयोग होतो, तर त्याच्या राखेत लोह, चुना, पोटॅश, मॅग्नेशियम, गंधक, सोडियम व स्फुरद आदी संयुगे असतात. त्यामुळे खत म्हणूनही त्याचा उत्तम वापर होतो. जमिनीची धूप थांबविण्यासाठी लावल्या जाणाºया या वृक्षाची तोड थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनप्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी, दसºयाला सोने  म्हणून आपट्याची पाने वाटण्याऐवजी आपटा वृक्षाचे रोप भेट देण्याचीप्रथा सुरू केली तर शहरात आपटा वृक्षांची संख्या दीडशेवरून दीड हजारांवर जाण्यास मदत होऊ शकते.आपटा समजून कांचन वृक्षावर कुºहाडआपटा वृक्षाची संख्या कमी होत चालल्याने आपट्याच्या पानासारखीच दिसणारी कांचन वृक्षाची पाने बाजारात आपटा म्हणून विक्रीला आणली जातात. त्यामुळे कांचन वृक्षावरही कुºहाड चालवून त्याची बेसुमार कत्तल होत असते. नाशिक शहरात ३४७७ कांचन वृक्ष आढळून आले आहेत. आपटा आणि कांचन वृक्षाच्या पानांमध्ये साम्य आढळून येत असल्याने आपटा म्हणूनच कांचनची पाने सोने म्हणून वाटली जातात.