नाशकात २३ पासून ऑनलाइन रोजगार मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:19 IST2021-08-19T04:19:18+5:302021-08-19T04:19:18+5:30

नाशिक : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत २३ ते २७ ऑगस्टदरम्यान महास्वयम् वेबपोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने ...

Online job fair from 23rd in Nashik | नाशकात २३ पासून ऑनलाइन रोजगार मेळावा

नाशकात २३ पासून ऑनलाइन रोजगार मेळावा

नाशिक : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत २३ ते २७ ऑगस्टदरम्यान महास्वयम् वेबपोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अलका तडवी यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा रोजगार मेळावा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवा योजना नोंदणी केली नसेल अशा उमेदवारांनी रोजगार महास्वयम् संकेतस्थळावर किंवा ॲण्ड्रॉईड मोबाइलधारकांनी प्ले स्टोअरमधून महास्वयमचे मोफत ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी. या पोर्टलवरील नोंदणीकृत उमेदवारांनी सादर केलेल्या पदानुसार आवश्यक कागदपत्रे व निकष पूर्ण करीत असल्यास त्या उमेदवारांची निवड नियुक्तीधारकांकडून भ्रमणध्वनीद्वारे मुलाखत घेऊन करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त अलका तडवी यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त अलका तडवी यांनी दिली.

Web Title: Online job fair from 23rd in Nashik