लॉटरीच्या दुकानात आॅनलाइन मटका

By Admin | Updated: June 22, 2017 18:49 IST2017-06-22T18:49:29+5:302017-06-22T18:49:29+5:30

लॉटरीच्या दुकानामध्ये आॅनलाईन मटका नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहितीवरून पोलिसांनी शालीमार येथील गजानन लॉटरीच्या दुकानावर पोलिसांनी छापा मारला.

Online game in lottery store online | लॉटरीच्या दुकानात आॅनलाइन मटका

लॉटरीच्या दुकानात आॅनलाइन मटका

नाशिक : लॉटरीच्या दुकानामध्ये आॅनलाईन मटका नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहितीवरून पोलिसांनी शालीमार येथील गजानन लॉटरीच्या दुकानावर पोलिसांनी छापा मारला.
याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदर लॉटरीच्या दुकानामध्ये आॅनलाईन लॉटरीच्या नावाखाली मटका प्रकाराचा जुगार खेळला जात होता. याप्रकरणी मिळालेल्या माहितीवरून संशयास्पद दुकानावर जाऊन पोलिसांनी खात्री केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी दुकानमालक सुरेश गोपाळ जोशीसह (६६,रा. चेतनानगर) २१ संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे ४० हजार ८०० रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Online game in lottery store online