ग्रामीण भागात झाडावर आॅनलाइन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 07:04 PM2020-10-04T19:04:48+5:302020-10-04T19:05:47+5:30

पेठ : शाळा बंद शिक्षण सुरू असले तरी पेठ तालुक्यात जवळपास सर्वच शासकीय व खासगी कंपन्यांची दूरसंचार यंत्रणा कोलमडली असल्याने टॉवर असून रेंज मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक व नागरिक हैराण झाले आहेत. टॉवरखाली नॉट रिचेबल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडावर चढून आॅनलाइन शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे.

Online education on trees in rural areas | ग्रामीण भागात झाडावर आॅनलाइन शिक्षण

ग्रामीण भागात झाडावर चढून आॅनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थी.

Next
ठळक मुद्देशोभेचे टॉवर : रेंज-इंटरनेटअभावी पेठ तालुक्यात विद्यार्र्थी-पालकांची परवड; सहसंपर्कात अडथळे

पेठ : शाळा बंद शिक्षण सुरू असले तरी पेठ तालुक्यात जवळपास सर्वच शासकीय व खासगी कंपन्यांची दूरसंचार यंत्रणा कोलमडली असल्याने टॉवर असून रेंज मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक व नागरिक हैराण झाले आहेत. टॉवरखाली नॉट रिचेबल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडावर चढून आॅनलाइन शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे.
पेठ तालुक्यातील बहुताश गावांना दूरसंचार कंपन्यांचे मनोरे आल्याने ग्राहकांनी चांगली सेवा मिळेल या आशेने महागडे सिमकार्ड खरेदी केले. मात्र कोणत्याही प्रकारची रेंज मिळत नसल्याने असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. शाळा बंद असल्याने मुलांना आॅनलाइन अभ्यास दिला जात असून रेंज नसल्याने बहुतांश मुलांना झाडावर चढून रेंज शोधावी लागत आहे.

घराच्या बाहेर टेकडीवर किंवा झाडावर गेले की रेंज मिळते, मात्र घरात गेल्यावर रेंज व इंटरनेट गायब होते. त्यामुळे रात्री-अपरात्री मुले झाडावर बसून कसा अभ्यास करतील हा प्रश्न आहे. भारत संचार निगमसह खासगी कंपन्यांनी आपली सेवा न सुधारल्यास ग्राहक आंदोलन करतील.
- यशवंत गावंडे , ग्राहक, गावंधपाडा

Web Title: Online education on trees in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.