शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

आॅनलाइन शिक्षण तात्पुरती तडजोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:54 IST

नाशिक : सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात आॅनलाइन शिक्षणप्रणाली ही शाळांनी पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेली तात्पुरती तडजोड आहे. या काळात शासनाकडून खासगी शाळांना कोणत्याही स्वरूपाची सवलत दिली जात नाही. त्यामुळे शाळांना त्यांचा खर्च भागविण्यासाठी शुल्क वसुलीशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याचे पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. तर शाळांनीही काद्यानुसार निश्चित करण्यात आलेले शुल्क आकारणे आवश्यक असून, अतिरिक्त खर्चातील कपातीच्या रक्कमेचे शुल्क कमी करून पालकांना सवलत देणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशिक्षणतज्ज्ञांचे मत । कोविड संकटात शासनाकडून शाळांना सवलत नाही याचाही विचार व्हावा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात आॅनलाइन शिक्षणप्रणाली ही शाळांनी पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेली तात्पुरती तडजोड आहे. या काळात शासनाकडून खासगी शाळांना कोणत्याही स्वरूपाची सवलत दिली जात नाही. त्यामुळे शाळांना त्यांचा खर्च भागविण्यासाठी शुल्क वसुलीशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याचे पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. तर शाळांनीही काद्यानुसार निश्चित करण्यात आलेले शुल्क आकारणे आवश्यक असून, अतिरिक्त खर्चातील कपातीच्या रक्कमेचे शुल्क कमी करून पालकांना सवलत देणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.राज्यात शुल्क नियंत्रण कायदा अस्तित्वात आहे. त्यानुसार शाळांनी शासनाने मान्य केलेले शुल्कच आकरणे आवश्यक आहे. त्यापेक्षा अतिरिक्त शुल्क आकारणे शाळांची निश्चितच चूक आहे. सध्याच्या काळात पालकही संकटात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त शुल्काचा बोजा टाकता येणार नसल्याचे शाळांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शाळांसमोर शिक्षक शिक्षणेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन, शाळा देखभाल दुरुस्तीसाठी येणार खर्च, वीज बिल, मालमत्ता कर यासारखे खर्च आहेत. त्यात कोरोनाच्या संकटातही शासनाने शाळांना कोणतीही सवलत दिलेली नाही. त्यामुळे शाळांना हे खर्च पालकांकडून मिळणाºया शुल्कातच भागवायचे आहेत. यातून सध्याच्या संकटकाळात केलेली आॅनलाइन शिक्षणाची तात्पुरती तडजोड विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने यशस्वी व्हावी यासाठी संस्थाचालक आणि पालक या दोघांनीही परस्पर सहकार्याची भूमिक ा अंगिकारणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पालकांच्या सहकार्याने शिक्षण सुरुगुजरात उच्च न्यायालयाने शुल्क वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुजरात सरकारने कारवाई केली खरी, परंतु त्यामुळे खासगी शाळाचालकांनी आॅनलाइन शिक्षणही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात मात्र उच्च न्यायालयाने शासनाच्या शुल्कवाढ न करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यामुळे विविध खासगी शाळांमध्ये अजूनही कोरोनावर मात करून आॅनलाइन माध्यमातून शिक्षण सुरू असून, पालकांच्या सहकार्याने आॅनलाइन शिक्षण अजूनही सुरु आहे.कोरोनाआधीची शुल्क थकबाकी व कोरोना संकटातील थकीत शुल्क असे दोन प्रकारचे शुल्क थकीत आहेत. शाळांसाठी परीक्षा आणि निकाल हा शुल्क जमा करण्याचा कालावधी असतो. परंतु, यावर्षी परीक्षा रद्द झाल्या आणि निकाल आॅनलाईन पद्धतीने लागले. त्यामुळे गतवर्षातील मोठ्या प्रमाणातील शैक्षणिक शुल्क थकीत आहेत. त्याचप्रमाणे मार्च, एप्रिलसह जून व जुलै महिन्यांचे शुल्क शाळांना मिळू शकलेले नाही. त्यामुळे पालकांकडून शुल्क वसुलीशिवाय पर्याय नाही. मात्र काही पालकांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना सवलत देण्याची भूमिका शाळांनीही घ्यायला हवी.-दिलीप फडके, उपाध्यक्ष, नाशिक एज्युकेशन सोसायटीसध्या उत्पन्नाचे साधन नसले तरी शाळांसमोर शिक्षकांचे मानधन आणि अन्य खर्च कसा भागवायचा? असा प्रश्न आहे. शुल्क वसूल होत नसल्याने आवक शून्य आणि खर्च भरमसाठ अशी अवस्था असली तरी पालकांना शुल्कासाठी कोणतीही सक्ती केली जात नाही. सध्या आॅनलाइन शिक्षण सुरू असले तरी शुल्कासंदर्भात प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर विचार केला आहे. मात्र शिक्षकांचे मानधन अजूनही नियमित सुरु आहे.- अश्विनीकुमार येवला, सचिव, नाशिप्र

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण