शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण ; खासगी शाळांचा व्यावसायिक दृष्टीकोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 15:15 IST

खासगी शाळांनी व्यावसायिक दृष्टीकोन आत्मसात करीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. यात पूर्व प्राथमिक शाळाही मागे नसून नर्सरी सोबतच ज्युनीयर केजी व सिनीयर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. 

ठळक मुद्देखासगी शाळांचा व्यावसायिक दृष्टीकोन नर्सरीच्या विद्यार्थ्यांनाही ऑऩलाईन शिक्षण विद्यार्थी वाढविण्यासाठी शाळांमध्ये स्पर्धा

नाशिक : देशभरातील शाळा महाविद्यालये ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी व्यावसायिक दृष्टीकोन आत्मसात करीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. यात पूर्व प्राथमिक शाळाही मागे नसून नर्सरी सोबतच ज्युनीयर केजी व सिनीयर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. पूर्व प्राथमिक शाळांनी गेल्या वर्षी पालकांसोबत संवाद साधण्यासाठी तयार केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपच्या माध्यमातून झूम, गुगल मीट सारख्या अ‍ॅपच्या लिंग शेअर करून विद्यार्थ्यांच्या नवीन वर्षांचे वर्ग आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.अशा प्रकारे विद्यार्थ्यांसोबत मोबाईच्या माध्यमातून संवाद साधत शाळेतील शिक्षक मागील वर्षात विद्यार्थ्यांना शिकविलेल्या अभ्यासक्रमासह विविध प्रकारच्या कार्यनुभावंच्या प्रात्यक्षिकांची उजळणीही करून घेत आहेत. त्यासाठी पालकांना पूर्व सूचना दिली जात असून पालकांना विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यास सांगितले जात आहे. अशाप्रकारे ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा वापर करीत शाळेपासून विद्यार्थी दूर होऊन दुसऱ्या शाळेत प्रवेश घेऊन नये यासाठी शाळांकडून व्यावसायिक दृष्टीकोन जपला जात आहे. पूर्व प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान अथवा कोणतीही मदत मिळत नसल्याने या शाळांचे आर्थिक नियोजन विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शुल्कावरच अवलंबून असल्याने जितके अधिक विद्यार्थी तेवढेच अधिक उत्पन्न असे या शाळांचे समीकरण बनले आहे. त्यामुळे अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पट वाढविण्याची स्पर्धा निर्माण झाली असून या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पूर्व प्राथमिक शाळांनाही आॅनलाईन शिक्षणासारखा व्यावसायिक दृष्टीकोन आत्मसात करावा लागतो आहे. परंतु, अशाप्रकारे ऑनलाईन शिक्षण प्रणालीतून शाळा त्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन जपत असल्या तरी विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम  पालकांनाच पूर्ण करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक