शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या शाळेतही आॅनलाईन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 16:17 IST

नाशिक- सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे शाळांना सुट्या आहेत. मात्र, त्यानंतरही जवळपास सर्वच खासगी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाईलव्दारे शिक्षण देत आहेत. मात्र, महापालिकेच्या आनंदवली येथील शाळेतील शिक्षीका सविता बोरसे पाचवीच्या मुलांचा नियमीत अभ्यास आणि नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचा सरावही आॅनलाईनच करून घेत आहेत. अनेक शिक्षक अशाप्रकारचे प्रयोग करण्यासाठी प्रयत्न तर करीत आहेतच परंतु शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक मनपा शाळांनी आॅनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.

ठळक मुद्देआनंदवल्ली येथे प्रयोगमुलांना मोबाईलवर प्रश्न पत्रिकाप्रवेशासाठीही अनेक शाळा आॅनलाईन

नाशिक- सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे शाळांना सुट्या आहेत. मात्र, त्यानंतरही जवळपास सर्वच खासगी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाईलव्दारे शिक्षण देत आहेत. मात्र, महापालिकेच्या आनंदवली येथील शाळेतील शिक्षीका सविता बोरसे पाचवीच्या मुलांचा नियमीत अभ्यास आणि नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचा सरावही आॅनलाईनच करून घेत आहेत. अनेक शिक्षक अशाप्रकारचे प्रयोग करण्यासाठी प्रयत्न तर करीत आहेतच परंतु शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक मनपा शाळांनी आॅनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.

नाशिक महापालिकेच्या ९० शाळा आहेत. त्यात सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. ही संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून ई लर्निंगसह अनेक साधनांचा वापर केला जात आहे. बाभळेवाडी शाळा पॅटर्न राबवण्यासाठी मध्यंतरी चाळीस शिक्षक प्रत्यक्ष अनुभव घेऊन आल्यानंतर त्यांनी देखील प्रयोगशीलता दाखविण्यास सुरूवात केली आहे. त्यातच सध्या लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे मनपाच्या सर्व शाळा बंद आहेत. खासगी शाळा बंद असल्या तरी मोबाईल आणि विविध लिंक्सव्दारे शिक्षण दिले जात आहे. तसे महापालिकेत देण्याचे प्रयत्न होत आहेत. आनंदवल्लीतील शिक्षीका सविता बोरसे यांनी पाचवीतील सव्वाशे मुलांचा अभ्यास बुडू नये यासाठी पालकांच्या मोबाईल क्रमांक घेऊन वॉटस अ‍ॅप गु्रप तयार केले आहेत. त्यावर प्रश्नावली टाकून मुलांकडून ती भरून घेतली जात आहे. त्यामुळे मुलांचा अभ्यास सुट्टीतही सुरूच आहे. मुलांना नियमीत प्रश्नावली पाठविल्यानंतर त्यांना काही शंका असल्यास त्याचेही निरसन केले जात आहे.

याशिवाय काही शिक्षक व्हीडीओ तयार करण्याचा प्रयत्न आहेत. तर काही जण व्हीडीआ कॉलींग व्दारे देखील शंका निरसन करीत आहेत. याशिवाय आता लवकरच प्रवेश सुरू होणार असल्याने अनेक शिक्षकांनी मनपा शाळेत प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज पाठवून ते भरून घेण्यास सुरूवात केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEducationशिक्षण