शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन अर्ज
By Admin | Updated: October 4, 2015 22:40 IST2015-10-04T22:39:31+5:302015-10-04T22:40:49+5:30
नोव्हेंबरपर्यंत मुदत : महाविद्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन

शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन अर्ज
नाशिक : राज्यातील विविध महाविद्यालयांतील अभ्यासक्रमाच्या फक्त प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मिळण्यासाठी आॅनलाइन अर्ज तत्काळ भरण्याचे आवाहन मुंबई उपनगर समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी केले आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत असून, विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेपर्यंत महाविद्यालयांशी संपर्क साधून आॅनलाइन अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
सामाजिक न्याय विभागामार्फत महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देण्यात येते. त्यासाठी प्रत्येक वर्षी आॅनलाइन अर्ज करावे लागत होते. परंतु सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून केवळ प्रथम वर्षाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाच
आॅनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)