कांदा गडगडला

By Admin | Updated: December 24, 2016 00:59 IST2016-12-24T00:59:48+5:302016-12-24T00:59:48+5:30

कांदा गडगडला

Onion was scorched | कांदा गडगडला

कांदा गडगडला


लासलगाव : येथील बाजार समितीत शुक्रवारी ८५० वाहने कांद्याची आवक झाली. किमान भाव ४०० ते कमाल भाव ८०० तर सर्वसाधारण भाव ६०० रुपये प्रतिक्विंटल होते.
देशातील महत्त्वाच्या बाजारपेठेत मागणी असणाऱ्या शहराकरिता कांदा रॅकची मागणी व्यापारी नोंदवत आहेत; परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून मागणीप्रमाणे रॅक मिळत नाहीत तर मालट्रकने कांदा पाठविणे डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे भाडेवाढ झाल्यामुळे रेल्वेने कांदा पाठविण्याकरिता खासदार हरिश्चंद्र चव्हाण व खासदार हेमंत गोडसे यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
देशांतर्गत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक येण्यास सुरुवात झाल्याने देशात मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणात येत असून, बाजारभावात घसरण होत आहे तसेच चीन, इजिप्त आणि पाकिस्तानमधून आखाती देशात भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त दरात कांदा उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याने ही घसरण होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Onion was scorched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.