शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जिल्ह्यात कांद्याचा आलेख चढाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 12:59 AM

परराज्यात व परदेशात मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात सुधारणा झाल्यामुळे बळीराजा सुखावला असून, सध्या दर्जेदार व प्रतवारीनुरूप कांद्याला १४०० रुपये किंबहुना त्याहीपेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता आहे.

वणी : परराज्यात व परदेशात मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात सुधारणा झाल्यामुळे बळीराजा सुखावला असून, सध्या दर्जेदार व प्रतवारीनुरूप कांद्याला १४०० रुपये किंबहुना त्याहीपेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता आहे. नाशिक, नगर व पुणे भागातील कांद्याला मलेशिया, सिंगापूर, दुबई व आखाती देशात मागणी वाढली आहे. त्यात नाशिकचा कांदा दर्जेदार व टिकाऊ म्हणून परिचित असल्याने कंटेनरमधून समुद्रामार्गे सात दिवसांचा प्रवास करून सुखरूप व सुरक्षित परदेशी बंदरांवर पोहचत आहे. सद्यस्थितीत नाशिक, नगर व पुणे भागातून सुमारे सात ते आठ हजार कंटेनर कांदा मुंबई पोर्ट बंदरातून परदेशी जात आहे. कांदा खरेदी-विक्रीच्या धोरणाबाबत सरकारने अनुकूलता ठेवण्याचे आव्हान कांदा उत्पादकांनी केले आहे. परराज्यातील कांद्याचा साठा संपल्यात जमा असून, त्यात नवीन कांद्याच्या उत्पादनास अवधी आहे. काही भागात लागवड सुरू आहे तर नवीन कांदा उत्पादित होण्यास ७० ते ९० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. परराज्यात व महाराष्ट्रात थोड्याफार फरकाने अशीच स्थिती आहे. दरम्यान, अनुभवी व प्राप्त परिस्थितीचे अवलोकन करून साठवणूक केलेला कांदा सुरक्षित ठेवणाºया उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत. नाशिक, नगर व पुणे भागातून प्रतिदिवशी सुमारे आठ हजार कंटेनर परदेशात जात असल्याची माहिती कांदा निर्यातदार मनीष बोरा यांनी दिली. मुंबई भागातील न्हावा शेवा जैन पिटी पोर्ट तसेच बॉम्बे पोर्टअंतर्गत येणाºया बंदरावर परदेशात जाणारे कांदे कंटेनरद्वारे जहाजात ठेवण्यात येतात. क्षमतेइतका माल जहाजात ठेवल्यानंतर कांद्याची परदेशवारी सुरू होते. सुमारे सात दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर कांदा पोहचत असल्याची माहिती व्यापारी नंदलाल चोपडा व अशोक बोरा यांनी दिली.निर्यात शुल्कावर परिणाम शक्यपाकिस्तान, चीन व भारतातून सध्या कांद्याची निर्यात सुरू आहे. पाकिस्तान व चीनचे कांदा निर्यात शुल्क २५० ते ३०० डॉलर इतके आहे, तर भारताचेही निर्यातशुल्क या प्रमाणात राहिले तर कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील गतिमानता किमान दोन महिने अशीच राहील, अशी माहिती बोरा यांनी दिली. कारण भूतकाळात निर्यातशुल्क वाढल्याने निर्यातबंदीवर याचा परिणाम झाला होता. कांदा खरेदीकडे व्यापाºयांनी पाठ फिरविली होती. पर्यायाने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले होते व उत्पादकांनी अक्षरश: कांदे रस्त्यावर फेकले होते. अशा स्थितीमुळे उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निर्यातशुल्क व निर्यात याच्या समन्वयासाठी सकारात्मक व अनुकूल भूमिका अपक्षित असून, यावरच कांद्याच्या दराचे गणित अवलंबून असल्याचा सूर व्यापारी व उत्पादकांचा असल्याची माहिती अतुल पाटील यांनी दिली.वणी उपबाजारात ७५०० क्ंिवटल कांद्याची आवकवणी : कांद्याचा निर्माण झालेला तुटवडा व वाढलेल्या मागणीमुळे कांद्याच्या दरात होणारी वाढ उत्पादकांना दिलासा देणारी आहे. वणी उपबाजारात आज २५० वाहनांमधून सुमारे ७५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कळवण, देवळा, चांदवड तालुक्यातील उत्पादकांनी विक्रीसाठी कांदे उपबाजारात आणले होते. १४०० रु पये कमाल, किमान ११०० रुपये तर सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी - विक्रीचे व्यवहार पार पाडण्यात आले. कांद्याला मागणी वाढली असून, प्रतवारी करून कांदा विक्रीसाठी आणावा. त्यामुळे दर अधिक मिळतील, त्यानुसार उत्पादकांनी नियोजन आखण्याचे आवाहन दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील यांनी केले आहे.