लोकमत न्यूज नेटवर्कवणी : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने संमिश्र प्रतिक्रि या उमटत असून, कांद्याने केला वांधा अशी गृहिणीवर्गाची भावना असली तरी साठवणूक केलेला कांदा व देशांतर्गत असलेली मागणी याचा ताळमेळ बसत नसल्याने दराबाबत फारसा फरक पडणार नसल्याचा सूर उमटतो आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर भूतकाळाच्या तुलनेत वाढल्याने शेतकरीवर्गात सकारात्मक वातावरण होते तर व्यापारीवर्गाचीही भूमिका अनुकूल होती. कारण तेजीच्या व्यवहारात कांदा विक्र ीला अपेक्षेपेक्षा जास्त गती आली होती. गेल्या पंधरवड्यात तर चढ्या दराने कांदा खरेदी-विक्र ीचे व्यवहार पार पाडण्यात आले. आठवडाभरापूर्वी तर पाच हजाराच्या पुढे कांदा गेल्याने दरवाढीचे कारण शोधण्यासाठी समिती गठित करण्यात आली. त्या समितीने काही बाजार समितीला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, निर्यातमूल्य लेटर आॅफ क्रेडिटचाही वापर दर नियंत्रणासाठी करण्यात आला, मात्र त्याचाही फारसा परिणाम दरावर झाला नाही.दरम्यान, कांद्याची निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा फारसा प्रभाव पडणार नाही असा खरेदीदार घटक व बाजार समितीच्या सूत्रांचा अंदाज आहे. कारण भारतात सुमारे पन्नास हजार टन कांदा प्रतिदिवशी खाण्यासाठी वापरात येतो. त्या तुलनेत साठवणुकीचा समन्वय राखणे आव्हानात्मक बाब आहे. तामिळनाडू राज्यातील कांदा नेहमीप्रमाणे सध्याच्या कालावधीत येतो; मात्र मागील आठवड्यात पावसामुळे ते पीक लांबणीवर पडले आहे तसेच महाराष्ट्रात दिवाळीनंतर नवीन कांदा येण्याचा अंदाज आहे. त्याबरोबर कर्नाटक व दाक्षिणात्य राज्यातील कांद्याची स्थिती असमाधानकारक असल्याने मागणीपेक्षा पुरवठा कमी राहील, असा कयास व्यापारीवर्गाचा आहे. त्यामुळे नवीन कांदा बाजारात दाखल होईपर्यंत थोड्याफार फरकाने चढ्या दराने कांदा खरेदी करावा लागणार, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांमध्ये अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 22:50 IST
वणी : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने संमिश्र प्रतिक्रि या उमटत असून, कांद्याने केला वांधा अशी गृहिणीवर्गाची भावना असली तरी साठवणूक केलेला कांदा व देशांतर्गत असलेली मागणी याचा ताळमेळ बसत नसल्याने दराबाबत फारसा फरक पडणार नसल्याचा सूर उमटतो आहे.
निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांमध्ये अस्वस्थता
ठळक मुद्देसंमिश्र प्रतिक्रिया : दरात स्थिरता राहण्याचा खरेदीदारांचा दावा